बॉलिवूडची सिंबा गर्ल म्हणजेच सारा अली खान आपल्या अदा व अभिनय कौशल्यानं रसिकांना घायाळ केले आहे. साराने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सारा चित्रपटांशिवाय अफेयर्समुळे चर्चेत येत असते. आतापर्यंत तिने बॉलिवूडच्या पाच अभिनेत्यांना डेट केल्याचं बोललं जातं.
कमी कालावधीत सारा अली खानने लोकप्रियता कमाविली आहे. ती नेहमी चाहत्यांसोबत प्रेमाने वागत असते. त्यांना सेल्फी देत असते. तसेच सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत येत असते. याव्यतिरिक्त ती डेटिंगमुळे चर्चेत येत असते.
वीर पहारिया - एकेकाळी सारा राजकीय नेत्यांचा नातू वीर पहारियाला डेट करत होती. वीर सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सारा व वीर या दोघांनी सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले होते. त्यानंतर साराने ते डिलीट केले.ईशान खट्टर - सारा अली खान शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तिने याबाबतचा खुलासा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणमध्ये केला होता. यावेळी साराने संकेत देत म्हटलं होतं की, बॉलिवूडमधील दोन भावांपैकी एकाला मी डेट केले होते. सारा व ईशान बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र दिसायचे.
हर्षवर्धन कपूर - सारा सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धनसोबत हातात हात घालून फिरताना दिसले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारा आणि हर्षवर्धन एकमेकांना बेबी असे संबोधायचे. असेही सांगितले जाते की, ते दोघे सैफ आणि करीनाच्या घरी पार्टीतही दिसले होते. ज्याच्यामुळे अमृता सिंग भडकली होती.
सुशांत सिंग राजपूत - केदारनाथ चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या वेळी सारा व सुशांत एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त समोर आले होते. त्यावेळी बऱ्याच लोकांनी त्या दोघांना सीक्रेट डिनर वगैरे करताना पाहिले होते. करिना कपूरने तिला सुशांत सिंग राजपूतच्या अफेयरवरून सल्ला दिल्यानंतर तिने ते नातं तिथेच थांबवल्याचं सांगितलं जातं.
कार्तिक आर्यन - कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये सारा अली खानने कार्तिक आवडत असल्याचं सांगितलं होतं. हे वृत्त वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं होतं. रणवीर सिंगने देखील लोकमत स्टाईल अवॉर्डमध्ये त्या दोघांची ओळख करून दिली होती. त्यानंतर त्या दोघांचे एकत्र बरेच फोटो व व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर ते दोघे इम्तियाज अलीच्या लव आज कल २च्या शूटिंगदरम्यान एकत्र आले आणि त्यावेळचे त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर कार्तिकने शूट थांबवून साराचा बर्थडे साजरा केला होता. जिथे ती बँकॉकमध्ये कुली नंबर १चे वरूण धवनसोबत शूटिंग करत होती.