कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या आगामी 'चंदू चॅम्पियन' सिनेमामुळे चर्चेत आहे. कबीर सिंह दिग्दर्शित या सिनेमासाठीकार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली आहे. गेल्या १३ वर्षांपासून कार्तिक आर्यन मनोरंजनसृष्टीचा भाग आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र इतक्या वर्षांनंतरही कार्तिक स्वत:ला आऊटसाइडरच मानतो. तसंच हा टॅग नेहमीच माझ्यासोबत राहील आणि मला यामुळे फरक पडत नाही असं तो म्हणाला.
कार्तिक आर्यनने 2011 साली लव रंजनच्या 'प्यार का पंचनामा' सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर त्याने 'सोनू की टीटू की स्वीटी', 'लुका छुपी', 'सत्यप्रेम की कथा', 'भूल भूलैय्या 2' या सिनेमांमधून मनोरंजन केलं. नुकतंच एका मुलाखतीत तो म्हणाला, "मी आजही आऊटसाइडरच आहे. जेव्हा मी करिअरची सुरुवात केली तेव्हा मी कोणालाही ओळखत नव्हतो. आजही काहीच बदललेलं नाही. काही शुक्रवार चांगले असतात तर काही वाईट. मी कधीच स्वत:ला इनसाइडर म्हणू शकत नाही. माझ्या डोक्यात आजही या गोष्टी सुरु असतात. हा माझा शेवटचा शुक्रवार, माझं कधीही पॅकअप होऊ शकचं असंच मला नेहमी वाटतं. माझ्याकडे कोणताही बॅकअप प्लॅन नाही. मला दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही."
कार्तिक आर्यनला चाहत्यांनी स्टार बनवलेलं आहे. 'चंदू चॅम्पियन'मधून आता तो काय जादू करतो हे पाहणं महत्वाचं आहे. येत्या १४ जून रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्यावर सिनेमा आधारित आहे. सध्या कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.