बॉलीवूडमध्ये लिंक-अपच्या आणि अफेअरच्या चर्चा काही नवीन नाहीत. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'कॉफी विद करण'मध्ये आली होती. त्यावेळी साराने कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे असे म्हटले होते कारण तिला कार्तिक खूप क्युट वाटतो.
यानंतर एका रेडिओ शोमध्ये साराने म्हटले होते की तिला तिचा पत्ता कार्तिकला पाठवायचा आहे कारण तिला तो फार आवडतो. साराने दोन वेळा कार्तिक आर्यन बाबत केलेल्या वक्तव्यामुळे इंटरनेटवर कार्तिक चांगलाच चर्चेत आला.
नुकत्याच एका इव्हेंट दरम्यान कार्तिकला याबाबत प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक आधी थोडासा लाजला आणि म्हणाला, सारा खूप सुंदर अभिनेत्री आहे.मला तिच्यासोबत कॉफी प्यायला आवडले.
एकदंर सगळे बघता सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करणार असल्याचे दिसतेय. इम्तियाज अलीने सारा अली खानसोबत आपल्या चित्रपटाबाबत चर्चादेखील केली आहे. रिपोर्टनुसार इम्तियाज अलीला सारा अली खानने होकार देखील दिला आहे. मात्र अजून कोणतिही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. साराच्या अपोझिट यात कार्तिक आर्यन दिसणार आहे.
सारा अली खानचा ‘केदारनाथ’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.