Join us

​कॅटरिनाला आली अक्कल... : उपचारासाठी गेली डॉक्टरकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2017 11:05 AM

बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफ आपल्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. मात्र याचवेळी तिला एका ...

बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफ आपल्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. मात्र याचवेळी तिला एका समस्येचा सामना करावा लागतो आहे. या पिडेपासून मुक्ती मिळावी यासाठी तिने थेड डॉक्टरांना गाठले असून ती औषधोपचार घेत आहे. कॅटरिना सध्या अक्कल दाढेच्या येण्यामुळे त्रस्त असून तिचा चेहरा सुजला आहे. मागील काही दिवसांपासून अक्कल दाढेच्या (विस्डम टूथ) त्रासामुळे त्रस्त आहे. कॅटरिनाला अनेक इव्हेंटमध्ये सुजलेल्या चेहºयासह पाहण्यात आले आहे. ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी तिला अनेक ठिकाणी उपस्थित राहावे लागले. येथे तिला बरे वाटत नव्हते. दुखणे आणि इन्फेक्शनवर उपचार म्हणून कॅटरिनाने पेनकिलर व अ‍ँटी बायोटिक्स घेतली. मात्र यापासूनही तिला आराम मिळाला नाही. कामामुळे तिला डाक्टरांकडे जाण्यास उशीर झाला यामुळेच तिचे इन्फेक्शन वाढत गेले. डीएनएने दिलेल्या बातमीनुसार आता कॅटरिनाला सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. शूटिंगमुळे उपचारासाठी झालेल्या उशिरानंतर कॅटरिना सर्जरीसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मात्र येथून तिला परत पाठविण्यात आले. असे सांगण्यात येते की, तिचे इन्फेक्शन वाढले होते. तिला काही औषधे देऊन परत पठविण्यात आले होते. अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट पूर्णत: मनोरंजक चित्रपट आहे. विशेषत: लहान मुलांना ध्यानात ठेऊन हा चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असेही सांगितले जाते की, अनुराग बासूच्या मुलीला त्याचा बर्फी हा चित्रपट समजला नव्हता यामुळे त्याने जग्गा जासूस हा चित्रपट तयार केला आहे. याशिवाय अनुराग बासू रोमँंटिक चित्रपट निर्माण करू इच्छित होता म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांना आवडला होता.