Join us

कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:58 IST

कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे.

Katrina-Vicky Education : कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या दोघांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवलं आहे.  कतरिना आणि विकी यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चिल्या जातात. यामध्येच आता दोघांच्या शिक्षणाची चर्चा रंगली आहे. तर कतरिना आणि विकी यांच्यात सर्वात जास्त कोण शिकलेलं आहे, हे जाणून घेऊया.

कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांचा शैक्षणिक प्रवास खूपच वेगळा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कतरिना कैफ कधीच शाळेत गेलेली नाही. तिचे शिक्षण घरीच गृहशिक्षकामार्फत झालं. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यापारी होते, तर आई सुझैन ही ब्रिटिश आहे. कतरिनाचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेले.  यामुळेच ती कधी शाळेत गेली नाही आणि घरूनच शिकली. ब्रिटीश असल्याने तिचे इंग्रजी उत्तम आहे.

कतरिनाने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षांनी ती मुंबईत आली आणि इथेही तिचे मॉडेलिंग करिअर सुरू ठेवले. त्यानंतर हळूहळू तिने तिच्या करिअरमध्ये प्रगती केली आणि आज तिचा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला आहे.

विकी कौशलबद्दल बोलायचे झालं तर तो प्रसिद्ध दिग्दर्शक शाम कौशल आणि वीणा कौशल यांचा मुलगा आहे. हिंदू-पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या विकीने सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून केले. विकीने 2009 मध्ये मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली. याशिवाय विकीने किशोर नमित कपूरच्या ॲक्टिंग स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केला आहे.

टॅग्स :कतरिना कैफशिक्षणसेलिब्रिटीविकी कौशल