Join us

विकी कौशल-कतरिनाच्या लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, इव्हेंट कंपनीच्या पाया खालची सरकली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:34 IST

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :या कार्डमध्ये लग्नाची तारीख आणि ठिकाणही लिहिलेले आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफचा विवाहसोहळा (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding ) सुरू झाला असून पाहुणेही लग्नाच्या ठिकाणी पोहोचू लागले आहेत.. मात्र आजपर्यंत विकी-कतरिनाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका कोणालाच पाहायला मिळाली नाही. कारण विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नात अत्यंत  प्रायव्हसी ठेवली होती.  पण आता त्याच्या लग्नाच्या कार्डचा फोटो लीक झाला असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कतरिना कैफच्या फॅन पेजवरून विकी कौशल-कतरिना कैफच्या इन्व्हिटेशन कार्डचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत 'विकी वेड्स कतरिना' असे लिहिले आहे. हे कार्ड इंग्रजीमध्ये छापलेले आहे. या कार्डमध्ये लग्नाची तारीख आणि ठिकाणही लिहिलेले असते. त्यात 'विकी वेड्स कतरिना' खाली लिहिले आहे, "गुरुवार, ९ डिसेंबर २०२१, सिक्स सेन्स फोर्ट हॉटेल, राजस्थान." हे कार्ड पाहून लोका त्यांचं अभिनंदन करतायेत. मात्र, हे अधिकृत निमंत्रण कार्ड आहे की नाही याची पडताळणी झालेली नाही.  

सूत्रांच्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही धर्म पद्धतीनुसार लग्न करणार आहेत.प्रथम या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्नसोहळा होईल व त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेदेखील ते लग्नगाठ बांधणार आहेत.सध्या कतरिना तिच्या हळदी, संगीत आणि मेहंदी सोहळ्यात बिझी आहे. कतरिनाच्या हातावर खास राजस्थानमधील प्रसिद्ध मेहंदी लागणार आहे. या मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ४०० मेहंदीचे कोन मागवण्यात आले आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल