Join us  

पहिल्या होळीला हातात हात घेऊन दिसले Katrina Kaif आणि Vicky Kaushal, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:39 AM

Vicky Kaushal - Katrina Kaif : या व्हिडीओत ब्लू कलरच्या बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये कतरिना फारच सुंदर दिसत आहे. तर विक्की कौशल रेट्रो लूकचा ब्लेजर घालून डॅशिंग अंदाजात दिसत आहे.

नुकतच लग्न झालेलं कपल विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) लग्नानंतर ही पहिलीच होळी आहे. अशात त्यांचा सोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दोघेही फारच रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. गेल्या रात्री दोघेही एका  पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन एन्ट्री घेतली.

या व्हिडीओत ब्लू कलरच्या बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये कतरिना फारच सुंदर दिसत आहे. तर विक्की कौशल रेट्रो लूकचा ब्लेजर घालून डॅशिंग अंदाजात दिसत आहे. दोघांनी कारमधून उतरताच एकमेकांचा हात हाती घेतला आणि फोटोग्राफर्सना पोज देत होते. ते धर्मा प्रॉडक्शनचा सीईओ अपूर्व मेहताच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाले होते.

यावेळी सर्वांच्या नजरा विक्की कौशलवर होत्या. लोक फारच केअरिंग हसबंड म्हणत आहे. व्हिडीओत तो पत्नीच्या कंफर्टकडे लक्ष देताना दिसत आहे. लोक व्हिडीओवर मेड फॉर इच अदर सारख्या कमेंट्स करत आहेत.

दरम्यान सध्या विक्की कौशल आणि कतरिना कैफ आगामी सिनेमात बिझी आहे. विक्की कौशल तीन सिनेमात दिसणार आहे. तर कतरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफबॉलिवूड