Join us

आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 5:26 PM

Katrina Kaif Education: विकी कौशल हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.

Katrina Kaif Education:  पूर्वाश्रमीची कतरिना कैफ (Katrina Kaif )आणि आत्ताची मिसेस कौशल बॉलिवूडची बडी अभिनेत्री. आज ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणाऱ्याअभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक इव्हेंटमध्ये, मुलाखतींमध्ये कतरिनाला फाडफाड इंग्रजी बोलताना तुम्ही ऐकलं असेल. पण ही कतरिना किती शिकलीये, तुम्हाला ठाऊक आहे का?कतरिनाचा पती विकी कौशल  (Vicky Kaushal) हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कधीच शाळेत गेली नाही. आता याचं कारण काय तर सततचा प्रवास.  होय, कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते, तर आई सुझान ब्रिटिश आहे. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यामुळे आईनंच कतरिनाला लहानाचं मोठं केलं. तिच्या आईने समाज कार्यात स्वत:ला वाहून घेतलं. या कामासाठी तिच्या आईला अनेक देशांमध्ये सारखं फिरावं लागे.

हाँग काँगमध्ये कतरिनाचा जन्म झाला. पण त्यानंतर चीन, जपान नंतर जपानमधून बोटीने फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा  जवळपास 18 देशांमध्ये कतरिनाचं बालपण गेलं. सतत देश बदलतं असल्याने कतरिना शाळेत कधीच जाऊ शकली नाही. तिने आणि तिच्या बहिणींनी घरीच शिक्षण घेतलं.  तिला शिकवण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त केले गेले.  पोलंड, बेल्जियम, हवाई आणि मग कतरिनाचं कुटुंब लंडनमध्ये स्थायिक झालं. 

कतरिनाने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षांनी कतरिना मुंबईत आली आणि भारतातही तिनं तिचं मॉडेलिंग करिअर सुरू ठेवलं. पुढे काय तर ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली.  कतरिनाने नुकतंच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूड