कतरिना कैफ (Katrina Kaif )बॉलिवूडची मोठी स्टार आहे. साहजिकच कॅट कधी लग्न करणार, हे जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. अशात काल अचानक कतरिनाने विकी कौशलसोबत ( Vicky Kaushal) गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरू झाली. अगदी रोका सेरेमनी झाल्याचीही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. काल दिवसभर सोशल मीडियावर कॅट व विकीच्या साखरपुड्याचीच चर्चा होती. पण ही बातमी किती खरी, किती खोटी हे कळायला मार्ग नव्हता. पण आता कतरिनाच्या टीमने यावर मोठा खुलासा केला आहे.
झूम एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाच्या टीम प्रवक्त्याने कॅट व विकीचा साखरपुडा झाल्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचे म्हटले. कोणाचाही साखरपुडा झालेला नाही. कोणतीही रोका सेरेमनी झालेली नाही. या निव्वळ अफवा आहेत, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले. विकीने मात्र अद्यापही यावर मौन बाळगले आहे.कतरिना लवकरच ‘टायगर 3’च्या शूटींगसाठी रशियाला रवाना होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कतरिना व विकी कौशल रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी दीर्घकाळापासून चर्चा आहे. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट विकीत गुंतली. अनेक प्रसंगी दोघे एकत्र दिसले. अर्थात अद्याप दोघांनीही रिलेशनशिपची कबुली दिलेली नाही. अलीकडे अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने मात्र चुकून विकी व कॅटच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. विकी आणि कतरिना एकत्र आहेत, हे खरे आहे. कदाचित हे सांगितल्यामुळे माझ्या अडचणी वाढू शकतात? मात्र त्यांचे नाते आता बºयापैकी जगजाहिर झाले आहे, असे हर्षवर्धन म्हणाला होता.