Join us

कॅटरिना कैफ खूश्श! कारण भाईजान खूश...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 5:10 PM

केवळ अली अब्बाससाठी भारत’हा चित्रपट साईन केल्याचे कॅट म्हणत असेल तर ती काहीतरी विसरतेय. सूत्रांचे मानाल तर ‘भारत’ने कॅटरिनाचा दुहेरी फायदा केला.

प्रियांका चोप्राने ‘भारत’ सोडला आणि तिच्या जागी कॅटरिना कैफची वर्णी लागली. अलीकडे कॅटरिना याबद्दल बोलली होती. मी सलमान खानमुळे हा चित्रपट साईन केला, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाही. मी केवळ अली अब्बास जफर याच्याकडे पाहून हा चित्रपट साईन केला, असे कॅटने म्हटले होते. अली माझा खूप चांगला मित्र आहे. याआधीही आम्ही एकत्र काम केलेय. त्याने मला फोन केला. तुला स्क्रीप्ट पाठवतोय, आवडली तर बघ, असे तो मला म्हणाला. मी ‘भारत’ची स्क्रिप्ट वाचली. ती मला प्रचंड आवडली आणि मी हा चित्रपट साईन केल्याचे  कॅट म्हणाली होती. पण कदाचित कॅटरिनाने पूर्ण माहिती दिलेली  नाही. कारण केवळ अली अब्बाससाठी हा चित्रपट साईन केल्याचे कॅट म्हणत असेल तर ती काहीतरी विसरतेय. सूत्रांचे मानाल तर ‘भारत’ने कॅटरिनाचा दुहेरी फायदा केला. होय, ‘भारत’च्या रूपात कॅटरिनाच्या हाती एक मोठा चित्रपट लागलाचं पण यासोबतच या चित्रपटासाठी तिला डबल फी सुद्धा मिळली. याचे कारण म्हणजे, भाईजान खूश आहे.प्रियांकाने ऐनवेळी ‘दगा’ दिल्यानंतर कॅटरिनाने हा चित्रपट करण्यास होकार दिला. कॅटची ही गोष्ट सलमानला चांगलीच भावलीय. त्यामुळे याची भरपाई म्हणून न मागता कॅटरिनाचे मानधन वाढवण्यात आले आहे. म्हणजे,आता कॅटरिनालाही प्रियांका इतकीच फी दिली जाणार आहे. कॅटरिना एका चित्रपटासाठी ५ ते 6 कोटी रूपये घेते. पण या चित्रपटासाठी तिला १२ कोटी रूपये मिळतील. कारण प्रियांकानेही १२ कोटी रूपयांत हा चित्रपट साईन केला होता. आहे ना कॅटरिनाचा डबल फायदा!!सध्या कॅटरिनाकडे दोन मोठे चित्रपट आहेत. एक शाहरूख खानसोबतचा ‘झिरो’ आणि दुसरा आमिर खानसोबतचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’. आता सलमान खानसोबतचा ‘भारत’ही तिच्या झोळीत पडला आहे. एकंदर काय तर कॅटचे नशीब सध्या जोरावर आहे.

टॅग्स :कतरिना कैफ