विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील सुपरहिट जोडी. लग्नानंतर कतरिनाचा विकीच्या कुटुंबासोबतचा बॉन्ड नेहमी दिसून येतो. कतरिना पक्की गृहिणी झाली आहे असं विकी नुकतंच एका मुलाखतीत म्हणाला. लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी शिरा आणि इतर पदार्थ बनवले आहेत. ते फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता तर कतरिना महिन्याचं बजेटही ठरवते असं तो म्हणाला आहे.
विकी सध्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, "मला फार मजा येते जेव्हा कतरिना प्रत्येक आठवड्यात घरात मीटिंग ठेवते. ती सगळ्या स्टाफला एकत्र काम बोलवते आणि त्यांच्यासोबत बजेटची चर्चा करते. पण जेव्हा ही चर्चा सुरु असते तेव्हा मी प्रेक्षकांसारखा बघत मजा घेत असतो. यावेळी मी हातात पॉपकॉर्न घेऊन बसतो."
विकी कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' सिनेमा हा लग्न, कुटुंब यावर आधारित आहे. घर घेण्याच्या प्रयत्नात असलेले नवरा बायको सरकारी योजनेत घर मिळावं म्हणून घटस्फोट घेतात. पण खोटा घटस्फोट घेऊन नंतर त्यांच्यात खरी भांडणं कशी होतात हे यामध्ये दाखवलं आहे. प्रमोशनवेळी विकीने खऱ्या आयुष्यातही कतरिना सोबतचा संसार कसा सुरु आहे यावरही त्याने दिलखुलास संवाद साधला आणि धम्माल आणली.