कॅटरिना कैफने ऐश्वर्या राय-बच्चनचा केला अपमान; सर्वांसमोर म्हटले ‘लोमडी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 3:58 PM
गेल्यावर्षी आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन खूपच हॉट अंदाजात बघावयास मिळाली होती. अभिषेक बच्चनशी विवाह ...
गेल्यावर्षी आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन खूपच हॉट अंदाजात बघावयास मिळाली होती. अभिषेक बच्चनशी विवाह केल्यानंतर पहिल्यांदाच ऐशचा जबरदस्त ग्लॅमरस अंदाज पडद्यावर बघावयास मिळाला होता. चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटासाठी दोघांनी हॉट फोटोशूटही केले होते. यातील काही फोटोंनी तर इंटरनेटवर धूम उडविली होती. याचदरम्यान अशीही बातमी समोर आली होती की, ऐशच्या या बोल्ड अंदाजामुळे बच्चन परिवार खूपच नाराज झाला होता. विशेषत: सासू जया बच्चन यांना रणबीरसोबत ऐशचे हे बोल्ड फोटोशूट अजिबातच आवडले नव्हते. त्याचबरोबर रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफही ऐशवर त्यावेळी चांगलीच भडकली होती. खरं तर ऐश्वर्याच्या सौंदर्यावर आजही अनेक सेलिब्रिटी फिदा आहेत. परंतु कॅटला तिचा हा अंदाज अजिबातच आवडला नसल्याने तिने तिला असे काही सुनावले होते, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. रणबीर आणि कॅट जेव्हा त्यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचे प्रमोशन करीत होते तेव्हा कॅटने ऐश्वर्याला सर्वांसमोर ‘लोमडी’ असे संबोधले होते. वास्तविक त्यावेळी रणबीर आणि कॅटरिना फेसबुक लाइव्ह करीत होते. त्यादरम्यान त्यांनी बरेचसे गेम खेळले होते. गेम खेळताना रणबीरने कॅटरिनाला स्टारचे नाव प्राण्याच्या नावाशी जोडण्यास सांगितले. जेव्हा रणबीरने ‘लोमडी’ असे म्हटले तेव्हा कॅटने फारसा उशीर न करता लगेचच ऐश्वर्याचे नाव घेतले. कॅटचे हे उत्तर ऐकूण सगळेच अचंबित झाले. यावेळी कॅटने इतरही अभिनेत्रींना कुठल्यान् कुठल्या प्राण्यांची नावे दिली. यामध्ये कॅटने रणबीरचेही नाव घेतले होते. कॅटने रणबीरला ‘बंदर’ असे संबोधले होते. एका चाहत्याने जेव्हा रणबीरला, तू तुझ्या आयुष्यातील सर्वात जवळच्या पाच व्यक्तींबद्दल काय सांगशील? असे विचारले तेव्हा त्याने त्यात कॅटच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यावेळी रणबीरने कॅटरिनाला म्हटले की, ‘जर मी तुला आनंदी ठेवू शकलो असतो तर कदाचित तुझेही नाव या पाच लोकांमध्ये मी घेतले असते.’