कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे. कतरिनाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते आणि त्यातही तिच्या फिटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत. ‘लॉकडाउन’ होण्यापूर्वी कतरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा रिलीज होणार होता. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाच्या रिलीजची तारीख आणि त्याची पोस्टर्स आणि बॅनर थिएटरमध्ये लावण्यात आली होते पण लॉकडाऊनमुळे त्याची रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली. त्याचा तिच्या उत्पन्नावरही परिणाम झाला.
कतरिनाने इतक्या कोटींची कमाई केली२०२० हे वर्ष कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यासाठी चांगले नव्हते. कतरिना कैफने २०१९ मध्ये २३.६३ कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई तिने 'भारत', 'झिरो' सारख्या चित्रपटांमधून आणि रीबॉक, ट्रॉपिकाना, लेन्सकार्ट, मेट्रो शू आणि ओप्पो यासारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून मिळवले. मात्र 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झला होता.
आलिया भट्टची कमाईकमाईच्या बाबतीत कतरिना कैफ आलिया भट्टपेक्षा खूपच मागे आहे. आलिया भट्टने २०१९ मध्ये दोन चित्रपट केले. 'गल्ली बॉय' आणि दुसरे 'कलंक'. गल्ली बॉय सुपरहिट झाला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रकारातील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आलिया भट्टने वर्ष २०१९ मध्ये ५९.१२ कोटींची कमाई केली.