Join us

​कॅटरिना कैफ म्हणाली, रणबीर कपूरसोबत पुन्हा काम शक्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 4:50 AM

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांचे लव्ह रिलेशन आता फार जुनी गोष्ट झाली. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे ...

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांचे लव्ह रिलेशन आता फार जुनी गोष्ट झाली. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोन लव्ह बर्ड्स कधी आणि कुण्या कारणाने वेगळे झालेत, हे कळायला मार्ग नाहीत. पण आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. अर्थात प्रोफेशनल लाईफमध्ये दोघेही एकत्र आहेत. रणबीर व कॅटरिनाचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा येत्या जुलैत प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने दोघेही एकत्र प्रमोशन करताना दिसत आहे.‘जग्गा जासूस’साठी रणबीर व कॅटरिना ब्रेकअपनंतर एकत्र आलेत. त्यावेळी सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. पण हा चित्रपट दोघांनी पूर्ण केला. शिवाय सगळे काही विसरून दोघेही एकत्र या चित्रपटाचे प्रमोशनही करत आहेत. अर्थात यानंतर काय? ‘जग्गा जासूस’नंतरही कॅटरिना व रणबीर प्रोफेशनल लाईफमध्ये एकत्र येतील? याचे उत्तर जाणून घेण्यास तुम्ही नक्कीच उत्सूक असाल. कॅटरिनाने याचे उत्तर दिले आहे. होय, इट विल नेव्हर हॅपन अगेन...,असे कॅटरिनाने स्पष्ट केले आहे.ALSO READ : कितने दुर कितने पास; रणबीर-कॅटमधील दुरावा कायम! भविष्यात पुन्हा रणबीरसोबत काम करशील का? असा प्रश्न कॅटरिनाला विचारला गेला. यावर नाही, असे पुन्हा घडणार नाही. रणबीरसोबत काम करणे अतिशय कठीण आहे. यापुढे आपण एकत्र काम करायचे नाही, हे रणबीरनेही मला सांगून टाकले आहे. त्यामुळे यापुढे मी व रणबीरने एकत्र चित्रपट हे कधीच घडणे नाही, असे कॅटरिना म्हणाली. या मुलाखतीवेळी रणबीरही हजर होता. पण त्याने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. आता रणबीर व कॅटरिनाच्या यापुढे एकत्र काम न करण्याच्या निर्णयामागचे कारण अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. ब्रेकअप पचवणे दोघांनाही जड जातेय. कदाचित तुम्ही कितीही प्रोफेशनल असाल पण प्रत्येकवेळी तुम्ही प्रोफेशनल बनू शकत नाही, हेच खरे!