बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. ती लवकरच सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. कतरिना व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. कतरिना शुक्रवारी सकाळी न्यूयॉर्कहून मुंबईला परतली. त्याचे एअरपोर्टवरील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहून लोकांनी तिच्या भवती गरडा घातला. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत सेल्फी घ्यायचा होता.
कतरिना कैफने एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ती स्काय ब्लू डेनिम आणि ब्राउन शीअर टॉपमध्ये कूललूकमध्ये दिसली. अभिनेत्रीचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. कतरिना कैफ तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
कतरिनासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. कतरिनाला चारही बाजूंनी चाहत्यांनी गरडा घातला. यातून तिला बाहेर पडणे कठीण झाले होते. कतरिनाच्या सुरक्षा रक्षकाने चाहत्यांना बाजूला करत तिला मार्ग मोकळा करुन दिला.
कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती. काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिनाचा एका चाहत्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये फॅन्ससोबत पोज देताना दिसले. हा फोटो फॅन पेजने शेअर केला आहे.
वर्क फ्रंटवर, कतरिना लवकरच विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवन ती मेरी ख्रिसमसमध्ये दिसणार आहे. ती शेवटची फोन भूत मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसली होती. कॅटरिनाच्या टायगर 3 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.कतरिना कैफ फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार होती. पण आता कतरिना आणि प्रियंकाऐवजी अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणी या चित्रपटात एन्ट्री करणार असल्याची बातमी आहे.