सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे. तुम्ही जाणताच की, १०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या जोडीच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटानेबॉक्स ऑफिसवर धूम केली होती. यानंतर २०१७ मध्ये प्रदर्शित या चित्रपटाचा सीक्वल ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड ध्वस्त केले होते. आता ‘एक था टायगर’ या सीरिजचा तिसरा सिनेमा येतोय आणि या सीक्वलमध्ये पुन्हा एकदा सलमान व कॅटची जोडी दिसणार आहे. सलमानने स्वत: सौदी फिल्म फेस्टिवलमध्ये याचा खुलासा केला.
तूर्तास या जोडीचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या २४ एप्रिलला याचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय आणि ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चाहते ‘भारत’कडे डोळे लावून बसले आहेत. ‘एक था टायगर’च्या तिस-या पार्टचीही चाहत्यांना तितकीच प्रतीक्षा असणार आहे.