Join us  

जेव्हा भर कार्यक्रमात कतरिना कैफ पडली होती मनोज वाजपेयींच्या पाया; काय आहे 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 11:00 AM

'राजनीति' हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. हा मल्टी-स्टारर चित्रपट 4 जून 2010 ...

'राजनीति' हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. हा मल्टी-स्टारर चित्रपट 4 जून 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अजूनही सर्वोत्तम राजकीय थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, मनोज बाजपेयी, रणबीर कपूर, अजय देवगण यासारखे मोठे कलाकार दिसले. या चित्रपटात कतरिना कैफचीही महत्त्वाची भूमिका होती. पण तुम्हाला माहितेय का, चित्रपटाचा प्रिमियर होता, तेव्हा भर कार्यक्रमात कतरिना कैफ ही मनोज वाजपेयींच्या पाया पडली होती. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया.

'राजनीति' या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी एक अतिशय दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटातील त्यांची भुमिका आजही लोकप्रिय आहे. तर कतरिना कैफ हिच्या भुमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. होतं.  हा चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली आहेत, पण अजूनही हा सिनेमा लोकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटातील मनोज वाजपेयीच्या अभिनयाने कतरिना कैफ इतकी प्रभावित झाली होती, की भर कार्यक्रमात ती मनोज यांच्या पाया पडली होती. 

रजत शर्माच्या 'आपकी अदालत'मध्ये मनोज वापेयींनी हा किस्सा सांगितला होता. चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी मनोज हे चित्रपटातील कलाकारांबरोबर फोटो काढत होते. तेव्हा कतरिना मनोज यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणाली, 'तुम्ही एक अद्भुत अभिनेता आहात'. कतरिनाच्या या कृतीमुळे मनोज बाजपेयी ओशाळले. तर याआधी मनोज वाजपेयींना असाच एक अनुभव १९९८ मध्ये 'सत्या' चित्रपटाच्यावेळी आला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री तब्बूही मनोज यांच्या पाया पडली होती. या कृतीमधून तिनं मनोज यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.  

टॅग्स :कतरिना कैफमनोज वाजपेयीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमातब्बू