अखेर विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. विकी व कतरिना दोघांनीही या लग्नाचे काही मोजके पण सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत. मग काय? हे फोटो पाहिल्यानंतर चर्चा रंगली ती कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीची आणि डायमंडच्या मंगळसूत्राची. होय, एका फोटोमधील कतरिनाच्या बोटातील ब्लू-डायमंड एंगेजमेंट रिंगनं (Katrina Kaif Blue Diamond Ring) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं मंगळसूत्रही लक्षवेधी ठरलं.
लग्नात कतरिना तिची खास एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसली. नेहमीच्या सॉलिटेअर एंगेजमेंट रिंंगची निवड न करता कतरिताने स्वत:साठी अगदी युनिक एंगेजमेंट निवडली. प्रिन्सेस डायनाची एंगेजमेंट रिंगही अशीच होती. प्रिन्सेस डायनाच्या निधनानंतर शाही कुटुबाने ती अंगठी त्यांची सून केट मिडलटनला भेट दिली होती.कतरिनाच्या चारी बाजूंनी हिरे असलेल्या या रिंगमध्ये मध्यभागी टिफनी सॉलिटेअर आहे. या टिफनी सॉलिटेअर एंगेजमेंट रिंगची किंमत सुमारे 7 ते 8 लाख रुपये आहे. विकी कौशलची एंगेजमेंट रिंग सुद्धा कमी खास नाही. ती प्लॅटिनमची आहे. मात्र, त्यात हिरा नाही.
मंगळसूत्रंही खास
विकी कौशलनं कतरिनाच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र सुद्धा खास आहे. मंगळसूत्रासाठी कतरिनाने सब्यसाची ज्वेलरी कलेक्शची निवड केली. सोन्याच्या तारात मढलेले सौभाग्याचं प्रतिक असलेले काळे मणी आणि खाली दोन डायमंड असे तिचे मंगळसूत्रही चाहत्यांनी नोटीस केलं. कतरिनाचे लग्नाचे सर्व दागिने सब्यसाची यांनीच डिझाईन केले होते. मंगळसूत्रही त्यांनीच डिझाईन केलं होतं.कतरिना-विकीची बिग फॅट वेडिंग अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे सात फेरे घेऊन दोघांनी आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला.