सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chhote Miyan Movie) हा चित्रपट चर्चेत आहे. जसजशी त्याची रिलीज डेट जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. दुसरीकडे, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)चे पडद्यामागचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान आता या चित्रपटासंदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे. वास्तविक, चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर(Ali Abbas Jafar)ने खुलासा केला आहे की या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंती कतरिना कैफ (Katrina Kaif) होती.
अली अब्बास जफरने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी जेव्हाही एखादा चित्रपट बनवतो तेव्हा माझ्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे कतरिना कैफ. जर मी तिला चित्रपटात कास्ट केले नाही, तर ती स्वतः मला कॉल करते आणि मला सांगते की तू का मला तुझ्या चित्रपटात घेतले नाहीस का" अली पुढे म्हणाला, "यावेळीही ती तेच म्हणाली. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. आम्ही नेहमीच एकमेकांची कंपनी एन्जॉय केली आहे."
अलीने कतरिनाची केली प्रशंसाअली म्हणाला, "मला वाटते एक अभिनेत्री म्हणून कतरिनामध्ये खूप क्षमता आहे. तिची प्रतिभा अद्याप पूर्णतः वापरण्यात आलेली नाही. मग तो 'भारत' असो, 'मेरे ब्रदर की दुल्हन' असो किंवा 'टायगर जिंदा है' . तिने खूप चांगले काम केले. जेव्हाही मी चित्रपट बनवतो तेव्हा मला पहिला फोन कतरिनाचा येतो. तेव्हा ती तक्रार करते की मी तिला कास्ट करत नाही."
कतरिनाने 'बडे मियाँ छोटे मियाँ' का नाही केला?अलीने सांगितले की, "बडे मियाँ छोटे मियाँच्या मुख्य नायिकांपैकी मी कतरिनाचे नाव फायनल केले होते आणि या चित्रपटासाठी ती माझी पहिली पसंती होती. तिला स्वतःला या चित्रपटात काम करायचे होते, परंतु ते शक्य झाले नाही. कारण ती त्या वेळी इतर कामात व्यग्र होती." अलीने आशा व्यक्त केली की कतरिना त्याच्या पुढील चित्रपटासाठी तिच्या तारखा ठेवेल.
या अभिनेत्री दिसणार सिनेमात अलीच्या या चित्रपटात आलिया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर दिसणार आहेत. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा देखील अलीनेच लिहिली आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोनित रॉय देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट १० एप्रिलला म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.