Join us

सनी कौशलच्या बर्थडे सेलिब्रेशनमधून वहिनीसाहेब गायब, लाडक्या दिराला या शब्दात दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 16:14 IST

सनीच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे फक्त वहिनीसाहेब यातून गायब आहेत.

बॉलिवूड अभिनेत विकी कौशलाचा लहान भाऊ आणि अभिनेता सनी कौशल आज त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. सनी आज त्याचा ३४वा वाढदिवसाचे सेलिब्रेशन कुटुंबासोबत करतोय. सनी देओलच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतायेत. सनीच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे फक्त वहिनी कतरिना कैफ यात मिसिंग आहे. ती या बर्थ डे सेलिब्रेशनचा भाग होऊ शकली नाही. पण तिने आपल्या लाडक्या दीराला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.   

सनीच्या बर्थ डे व्हिडीओमध्ये तो घरात केक कटिंग करताना दिसतोय. व्हिडीओ मोठा भाऊ विकी कौशल, वडील आणि आई सगळे आनंदात सेलिब्रेशन करताना दिसतेय. मात्र या व्हिडीओतून वहिनीसाहेब गायब आहेत. 

 लाडक्या दिराच्या वाढदिवशी कतरिनाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सनीसोबत विकीसुद्धा दिसोय. हा फोटो इन्स्टास्टोरीवर पोस्ट करताना तिने लिहिले, जगाताला सर्वात चांगला माझ्या दीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोबत

 तिनं हार्टचा इमोजी पोस्ट केलाय.     

 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी कौशल शेवटचा राधिका मदनसोबत शिद्दत सिनेमात दिसला होता. ही एक लव्ह-स्टोरी होती जी ओटीटीवर रिलीज झाली होती.  सिनेमात सनी आणि राधिकाशिवाय मोहित रैना आणि डायना पेंटीची देखील महत्त्वाची भूमिका होती. अलीकडेच या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची देखील घोषणा झालीय. सिनेमात सनीसोबत वामिका गब्बी झळकणार आहे.   

टॅग्स :कतरिना कैफ