Katrina Kaif's mom reply to Ranbir Kapoor's mother Neetu :रणबीर कपूरची आई व ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Ranbir Kapor's mom Neetu Kapoor) यांच्या एका पोस्टची बरीच चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या पोस्टमधून नीतू यांनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेन्ड कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांना टोला लगावल्याचं मानलं गेलं. “त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची इन्स्टा स्टोरी नीतू यांनी शेअर केली होती. त्यांच्या स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. यावरून अनेकांनी नीतू यांना ट्रोलही केलं होतं. आता नीतू यांनी खरंच रणबीरच्या एक्स गर्लफ्रेन्ड्सला टोमणा मारला की नाही, ते त्यांनाच ठाऊक. पण आता कतरिना कैफच्या आईची (Katrina Kaif's mother Suzanne ) अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. कतरिनाच्या आईची ही पोस्ट म्हणजे नीतू कपूर यांना उत्तर असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
रणबीर आणि कतरिना जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र अचानक दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपच्या काही वर्षांनंतर कतरिना त्याविषयी बोलली होती. “मी आता ब्रेकअपच्या घटनांना एका प्रकारची शिकवणच समजते. आता मी आयुष्यातील काही गोष्टींकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागले आहे. उलट ब्रेकअपमुळे मी स्वत:वर अधिक लक्ष केंद्रीत करू शकले”, असं ती म्हणाली होती.