वरूण धवनसोबत दिसली कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ; जाणून घ्या काय होते कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 8:59 AM
कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, ही बातमी आता जुनी झालीयं. होय, कारण या एन्ट्रीची तयारीही सुरु ...
कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, ही बातमी आता जुनी झालीयं. होय, कारण या एन्ट्रीची तयारीही सुरु झाली आहे. अलीकडे इसाबेलला एका मोठ्या कॉस्मेटिक ब्रॅण्डची जाहिरात मिळाली. या जाहिरातीचे शूटींग नुकतेच पार पडले. यानंतर इसाबेल मीडियासमोर हा ब्रॅण्ड प्रमोट करतानाही दिसली. आता यावेळी इसाबेलने बॅ्रण्ड प्रमोट करण्यापेक्षा दुसरेच काही केले, ही गोष्ट वेगळी. त्यामुळेच ब्रण्ड प्रमोशनऐवजी याठिकाणी इसाबेलने दाखवलेल्या नखºयांचीच जास्त चर्चा झाली. या ब्रॅण्ड प्रमोशनदरम्यान इसोबेल इलेक्ट्रॉनिक मीडियाशी तर बोलली पण प्रिंट मीडियाशी बोलण्यास तिने स्पष्ट नकार दिला. मला केवळ ब्रॅण्डशीसंबंधित प्रश्नचं विचारण्यात यावे. त्यापलीकडे मी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असा तोरा मिरवण्यापासून तर लाईट अरेंजमेंटवरून ड्रामा करण्यापर्यंत असे काय काय म्हणे इसाबेलने केले. हीच इसाबेल बुधवारी मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर दिसली. ती सुद्धा वरूण धवनसोबत. आता इसाबेल अन् वरूण धवन एकत्र म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शेवटी दोघांमध्ये काय खिचडी पकतेय, हे जाणून घेण्यास सगळ्यांना रस होता. अर्थात जरा खोलात शिरल्यावर भलतीच माहिती समोर आली. होय, इसाबेल व वरूण कुठल्याशा व्यावसायिक कारणाने नाही तर एका बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने एकत्र आलेत, असे नंतर कळले. ALSO READ : कॅटरिना कैफची बहीण इसाबेल आत्तापासून दाखवू लागलीयं अॅटिट्यूट! ही पार्टी होती, दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या बर्थ डेची. अली अब्बासने आपल्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली. या पार्टीत इसाबेल, वरूण यांनी हजेरी लावली. इसाबेलची बहीण कॅटरिना कैफ ही सुद्धा या पार्टीत हजर होती. सध्या कॅटरिना इसाबेलच्या करिअरसाठी दिवसरात्र खपते आहे. सलमानच्या मदतीने तिने तिला एका मोठ्या ब्रॅण्डची जाहिरात मिळवून दिली. पण आता इसाबेलला लॉन्च करायची कॅटची धडपड सुरु आहे. यासाठी अर्थात कॅटरिनाने पुन्हा एकदा सलमानला गळ घातल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा किती खरी अन् किती खोटी, ते आम्हाला ठाऊक नाही. पण एक मात्र खरे की, बहीणीसाठी कॅट दिवसरात्र खपते आहे. तिला बॉलिवूडच्या पार्ट्यांना घेऊन जाणे, हाही त्याचाच एक भाग.