Join us

दीपिका नव्हे, कतरिना होती 'लेडी सिंघम'साठी रोहित शेट्टीची पहिली निवड; ऑडिशनही दिलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 1:01 PM

Katrina Kaif : कतरिना कैफचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रोहित शेट्टीसमोर लेडी कॉपसाठी ऑडिशन देताना दिसत आहे.

रोहित शेट्टी(Rohit Shetty)च्या 'सिंघम' (Singham) या हिट फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'सिंघम अगेन'(Singham Again) ची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgn) सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी, सर्कस (Cirkus Movie) चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचच्या वेळी रोहित शेट्टीने सांगितले की, 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिरोईन असेल. ती या चित्रपटाची लेडी सिंघम असणार आहे. दरम्यान, कतरिना कैफ(Katrina Kaif)चा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती लेडी कॉपच्या भूमिकेसाठी रोहित शेट्टीचे ऑडिशन देताना दिसत आहे.

खरं तर, गेल्या वर्षी रोहित शेट्टी आणि कतरिना कैफरणवीर सिंगच्या 'द बिग पिक्चर' या गेम शोमध्ये सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. त्यावेळी कतरिनाने हे ऑडिशन मस्तीमध्ये दिले. कतरिना रोहित शेट्टीशी बोलतेय की 'मला वाटते की सूर्यवंशीनंतर तुम्ही एका महिला पोलिसावर चित्रपट करावा'.

यानंतर, कतरिना पोलिस अधिकाऱ्याची कॅप घालून स्टेजवर चालते आणि 'सिंघम'चा डायलॉग म्हणते, 'माझ्या विवेकात ताकद आहे कारण माझ्या गरजा कमी आहेत'. कतरिनाचा असा दमदार अभिनय पाहून रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी टाळ्या वाजवू लागतात. रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग कॅमिओ करताना दिसले होते. २०२१ साली रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

सध्या रोहित शेट्टी त्याचा नवीन चित्रपट सर्कसच्या रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, जो लोकांना खूप आवडला. या चित्रपटात पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, संजय मिश्रा, वरुण शर्मा यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. याआधी रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांनी 'सिंबा' आणि 'सूर्यवंशी'मध्ये एकत्र काम केले आहे 'सर्कस' २३ डिसेंबरला भेटीला येणार आहे.
टॅग्स :कतरिना कैफरोहित शेट्टीदीपिका पादुकोणरणवीर सिंगअजय देवगण