Join us

Katrina-Vicky Wedding: विकी कौशलनं इंजिनिअरिंगमधून केलंय ग्रॅज्युएशन, कतरिना कैफचं शिक्षण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 13:58 IST

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाबाबतचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल मीडिया रिपोर्ट्सनुसार आज म्हणजेच ९ डिसेंबरला लग्नबेडीत अडकणार आहेत. अद्याप दोघांकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचा(Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) व्हेन्यू, कार्ड, डिशेज, संगीत, मेहंदी पासून हनीमूनपर्यंत सर्व चर्चा झाल्या. त्या दोघांच्या लव्हस्टोरीपासून त्यांच्या लग्नाबाबत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची चर्चा चाहते सोशल मीडियावर करत आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. त्या दोघांच्या लग्नाचा फोटो पाहण्याआधी त्या दोघांचे शिक्षण जाणून घेऊयात. तसे तर दोघेही करिअरच्या बाबतीत यशाच्या शिखरावर आहेत. दोघांकडे कामाची कमतरता नाही. विकी कौशलचा जन्म मुंबईत झाला असून त्याने सिनेइंडस्ट्रीत अॅक्शन डिरेक्टर आणि स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे. जेव्हा त्याने अभिनय करायला सुरूवात केली तेव्हा त्याचा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्याच्या यादीत समावेश झाला. विकी कौशल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहे. त्याने २००९ साली राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे.

मॉडेलिंगसाठी कतरिनाने सोडले शिक्षण

तर मीडिया रिपोर्ट्सनुसार कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरूवात केली होती. तिने मॉडेलिंगसाठी शाळादेखील सोडली होती. तिने काही काळ ब्रिटेनमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर भारतात येऊन करिअरची सुरूवात केली. सिनेइंडस्ट्रीत तिची एन्ट्री झाल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ