Join us

‘केसरी’मध्ये अक्षयकुमारसोबत कॅटरिना नव्हे तर परिणिती चोपडा झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 1:35 PM

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने त्याचा ‘केसरी’ लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलची माहिती समोर येत असून, ...

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने त्याचा ‘केसरी’ लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलची माहिती समोर येत असून, सूत्रानुसार अक्षयसोबत अभिनेत्री परिणिती चोपडा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. होय, परिणितीचे नाव स्वत: निर्माता करण जोहर याने कन्फर्म केले आहे. याअगोदर ही भूमिका अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला आॅफर करण्यात आली होती, परंतु करणने आता या भूमिकेसाठी परिणिती चोपडा हिची निवड केली आहे. सुरुवातीला या चित्रपटाविषयी बºयाचशा गोष्टी चर्चिल्या गेल्या. या चित्रपटाची कधीच निर्मिती केली जाणार नसल्याचे बोलले गेले. परंतु जेव्हापासून अक्षयकुमारने त्याचा लूक मीडियासमोर शेअर केला तेव्हापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाला गेल्यावर्षी सलमान खान प्रोड्यूस करणार होता. परंतु मित्र अजय देवगणमुळे त्याने माघार घेतली. मात्र काही दिवसांनंतर अजयलादेखील या चित्रपटावर काम करता आले नाही.  हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, परिणिती अगोदर हा चित्रपट कॅटला आॅफर केला होता. परंतु डेट्स उपलब्ध नसल्याने तिला हा चित्रपट करता आला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करीत आहेत. १९८७ मध्ये ब्रिटिश भारतीय सेनेच्या एका छोट्याशा तुकडीत आणि अफगाण सेनेमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर (बॅटल आॅफ सारागढी) चित्रपटाची कथा आहे. या युद्धात केवळ २१ शीख जवान अफगाणच्या १० हजार सैनिकांना भारी पडले होते.