Join us

​‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये भाव खाऊन गेली कॅटरिनाची बहीण इसाबेल कैफ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 7:15 AM

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सध्या बॉलिवूड एन्ट्रीच्या तयारीत आहे. अशावेळी सगळ्यांचे ‘अटेन्शन’मिळवण्यासाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’ पेक्षा वेगळी जागा ...

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सध्या बॉलिवूड एन्ट्रीच्या तयारीत आहे. अशावेळी सगळ्यांचे ‘अटेन्शन’मिळवण्यासाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’ पेक्षा वेगळी जागा कुठली बरी असू शकेल? ‘लॅक्मे फॅशन वीक समर/ रिसॉर्ट2018’मध्ये इसाबेल कदाचित याच इराद्याने पोहोचली. तापसी पन्नू, शाहिद कपूर, मीरा राजपूत, यामी गौतम, समीरा रेड्डी, शमिता शेट्टी अशा अनेक सेलिबिटींनी रॅम्पवर आग लावली. पण सेलिब्रिटींच्या या गर्दीत इसाबेल सर्वाधिक लक्षवेधी ठरली. आपल्या अदा दाखवण्यात तिने जराही कसर सोडली नाही.  गे्ल्या दोन दिवसांपासून इसाबेल ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये न चुकता हजेरी लावतेय आणि यादरम्यान आपल्या ड्रेसिंग स्टाईलने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेय. काल  रॉयल ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमध्ये इसाबेल दिसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.आपल्या हास्याने तिने सगळ्यांना घायाळ केले. इंडस्ट्रीत नवखी असूनही मीडियाला ती ज्या आत्मविश्वासाने सामोरी जातेय, ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले नसेल तर नवल.  ALSO READ : ​वरूण धवनसोबत दिसली कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ; जाणून घ्या काय होते कारण!!सध्या कॅटरिना इसाबेलच्या करिअरसाठी दिवसरात्र खपते आहे. सलमानच्या मदतीने तिने तिला एका मोठ्या ब्रॅण्डची जाहिरात मिळवून दिली. पण आता इसाबेलला लॉन्च करायची कॅटची धडपड सुरु आहे. यासाठी अर्थात कॅटरिनाने पुन्हा एकदा सलमानला गळ घातल्याची चर्चा आहे.   अलीकडे इसाबेलला एका मोठ्या कॉस्मेटिक ब्रॅण्डची जाहिरात मिळाली. या जाहिरातीचे शूटींग नुकतेच पार पडले. यानंतर इसाबेल मीडियासमोर हा ब्रॅण्ड प्रमोट करतानाही दिसली. पण  ब्रण्ड प्रमोशनऐवजी याठिकाणी इसाबेलने दाखवलेल्या नखºयांचीच जास्त चर्चा झाली. या ब्रॅण्ड प्रमोशनदरम्यान इसोबेल इलेक्ट्रॉनिक मीडियाशी तर  बोलली पण प्रिंट मीडियाशी बोलण्यास तिने स्पष्ट नकार दिला. मला केवळ ब्रॅण्डशीसंबंधित प्रश्नचं विचारण्यात यावे. त्यापलीकडे मी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असा तोरा मिरवण्यापासून तर लाईट अरेंजमेंटवरून ड्रामा करण्यापर्यंत असे काय काय म्हणे इसाबेलने केले.