दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय. होय, ताज्या बातमीनुसार, माजी फुटबॉलपटू सैय्यद अब्दुल रहीमच्या बायोपिकमध्ये किर्तीची वर्णी लागली आहे.या बायोपिकबद्दल आणखी एक खास बातमी सांगायची झाल्यास, अजय देवगण यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजयची हिरोईन म्हणून किर्तीचे नाव फायनल झाले आहे. खुद्द किर्तीने या वृत्ताला दुजोरा दिला. सैय्यद अब्दुल रहीम यांचे नाव लोकांच्या विस्मरणात गेले आहे. निर्मात्यांनी मला या महान खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी दिली, त्याचा मला आनंद आहे, असे किर्तीने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती या चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.
ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:00 IST
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय.
ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!
ठळक मुद्देकिर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले.