Join us

केजरीवाल यांच्यावरील चित्रपटाला ब्रेक, PM मोंदींकडून घावी लागेल NOC !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 1:24 PM

-Ravindra Moreदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर बनलेला चित्रपट ‘अ‍ॅन इनसिग्निफेकंट मॅन’ला सेंसर ...

-Ravindra Moreदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर बनलेला चित्रपट ‘अ‍ॅन इनसिग्निफेकंट मॅन’ला सेंसर बोर्डाने ब्रेक लावला आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शीला दीक्षित यांच्या होकाराशिवाय अडकू शकतो. केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्डाचे म्हणणे आहे की, चित्रपटाला हिरवा झेंडा मिळण्यासाठी निर्मात्यांना पंतप्रधानांची अनुमती घ्यावी लागेल. म्हणजेच चित्रपट रिलीज होण्याअगोदर सेंसर बोर्डाने निर्देशकांना पीएम मोदींकडून एनओसी घेऊन आणायला लावले आहे. * यासाठी पाहिजे एनओसीसेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे प्रमुख पहलाज निहलानी यांनी चित्रपटाचे डायरेक्टर खुशबू रंका आणि विनय शुक्ला यांना सांगितले की, ‘हा चित्रपट ज्यांच्यावर बनला आहे आणि या चित्रपटात ज्या कोणी राजनीतिज्ञांचे फुटेज वापरले आहेत, त्यांच्या प्रदर्शनासाठी आपणास त्यांच्याकडून एनओसी घ्यावी लागेल.’ * ज्यांना समस्या असेल त्यांनी कोर्टात जावे एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या निर्मात्यांना भारतीय जनता पार्टी आणि कॉँगे्रसशी संबंधीत जुडलेल्या तथ्यांना हटविण्याचे सांगण्यात आले आहे. खूशबू रंका यांचे म्हणणे आहे की, ‘पहलाज निहलानींची आता अशी इच्छा आहे की, प्रधानमंत्रींनी सेंसर बोर्डाच्या अध्यक्षांचे काम करावे. आमच्या चित्रपटाविषयी ज्यांना काही समस्या असेल त्यांनी आमच्या विरोधात कोर्टात जावे.’ * पहलाज निहलानींचे हे आहे म्हणणेदुसरीकडे या प्रक रणी पहलाज निहलानी यांचे म्हणणे आहे की, ‘करण जौहरने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाचा वापर केला होता तेव्हा रवीनाची परवानगी घेतली होती. आम्हाला जेव्हा एनओसी उपलब्ध होईल, तेव्हाच चित्रपटाला हिरवा झेंडा मिळेल.’ निहलानी यांचे म्हणणे आहे की, ‘डॉक्यूमेंट्री चित्रपटाला हिरवा झेंडा दिलेला आहे, मात्र नियमानुसार ज्यांचे फुटेज वापरण्यात आले आहेत, त्याचे एनओसी लागते. यासाठी निर्मात्यांना सांगण्यात आले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शीला दीक्षित यांची एनओसी आवश्यक आहे.’