अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा 'केसरी चॅप्टर २' (Kesari 2) लवकरच रिलीज होणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांडमागचं सत्य उलगडणार आहे. नुकतंच सिनेमाच्या टीमने अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्यांनी वाहेगुरुंचं दर्शन घेतलं. अक्षक, माधवन यांच्यासोबत अनन्याही होती. त्यांचा फोटो आता समोर आला आहे.
'केसरी २'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी आला. १८ एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होत आहे. त्याआधी अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे अमृतसरला पोहोचले. तिथे त्यांनी सुवर्णमंदिराचं दर्शन घेतलं. अनन्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. माधवनने पांढरा कुर्ता घातला आहे तर अक्षय निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. अनन्याने बेबी पिंक रंगाचा ड्रेस आणि डोक्यावर ओढणी घेतली आहे. तिघंही हात जोडून उभे आहेत. अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह".
'केसरी २' मध्ये अक्षय कुमार आणि माधवन वकिलाच्या भूमिकेत आहेत. अक्षय सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे जे प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे नेते होते. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामागचं तथ्य समोर आणलं होतं आणि ब्रिटीश सरकारविरोधात कोर्टात हिंमतीने लढाई लढली होती. तर माधवन ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे वतील नेविल मॅककिनले यांची भूमिका साकारत आहे. अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने सिनेमाची निर्मिती केली आहे.