KGF Chapter 2 Box Office Collection : ‘केजीएफ’ सुपरडुपर हिट झाला आणि मेकर्सनी याचा सीक्वल अर्थात ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2 ) बनवण्याचा निर्णय घेतला. मेकर्स हा निर्णयही फायद्याचा ठरला. होय, ‘केजीएफ 2’ (KGF 2) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटाच्या 8 व्या दिवसाच्या कमाईचे आकडेही थक्क करणारे आहेत. ‘केजीएफ 2’ची जगभरातील कमाईचा आकडा 720 कोटींच्या पार गेला आहे. देशातील कमाईचा आकडा 524 कोटींचा टप्पाा गाठला आहे.
एकट्या हिंदी व्हर्जनने कमावून दिले 268 कोटी‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने छप्परफाड कमाई केली आहे. फक्त 9 दिवसांत या चित्रपटाने 268.63 कोटींचा बिझनेस केला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 53.95 कोटींची बंपर कमाई करत विक्रम रचला होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 46.79 कोटी कमावले. यानंतर तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, सातव्या दिवशी 16.35 कोटी आणि काल गुरूवारी आठव्या दिवशी 13.58 कोटींचा गल्ला जमवला. म्हणजेच 8 दिवसांत फक्त हिंदी व्हर्जनने एकूण 268.63 कोटीं कमावले.
‘केजीएफ 2’ नंबर 1देशात हिंदीत रिलीज झालेल्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 250 कोटींची कमाई केली नव्हती. ‘केजीएफ 2’ने ही किमया साध्य करत, नवा इतिहास रचला. याचसोबत ‘केजीएफ 2’ पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बनला. या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ला मागे सारले. रणबीर कपूरच्या ‘संजू’लाही पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप 5 यादीतून बाहेर केले.
पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 सिनेमेपहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘केजीएफ 2’ नंबर 1 वर पोहोचला आहे. 247 कोटी कमाई करणारा ‘बाहुबली 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 238 कोटींसह हृतिक रोशन व टायगर श्रॉफचा ‘वॉर’ तिसऱ्या तर 229 कोटी कमाई करणारा ‘सुल्तान’ चौथ्या क्रमांकावर आहे. टायगर जिंदा है हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर गेला असून पहिल्या आठवड्यात 203 कोटी कमाई करणारा ‘संजू’ सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे.