आता कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान कसा पूर्ण होणार संजय दत्तचा KGF 2, निर्मात्यांनी दिलं उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:02 PM2020-08-13T15:02:17+5:302020-08-13T15:11:43+5:30
संजय दत्त आजारी पडल्याने त्याचे अनेक प्रोजेक्ट अर्धवट पडले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा असलेला KGF 2 याचाही समावेश आहे. यात संजय एका व्हिलनची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता संजय दत्त याला लंग कॅन्सरचं निदान झालं आहे. या आजाराच्या तो तिसऱ्या स्टेजवर आहे. इतकेच नाही तर लवकरच या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी तो परदेशात जाणार असल्याची चर्चा आहे. अशात संजय दत्त आजारी पडल्याने त्याचे अनेक प्रोजेक्ट अर्धवट पडले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा असलेला KGF 2 याचाही समावेश आहे. यात संजय एका व्हिलनची भूमिका साकारणार आहे.
कधी पूर्ण करेल KGF 2 चं शूटींग
निर्माता कार्तिक गौडा म्हणाला की, संजय दत्त ३ महिन्यांनी पुन्हा शूटींग सुरू करेल. टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना निर्मात्याने सांगितले की, संजय दत्त तीन महिन्यांनंतर जेव्हा त्यांची ट्रीटमेंट संपेल तेव्हा ते परत येतील आणि माझा सिनेमा पूर्ण करतील. त्यांची टीम माझ्याशी बोलली. माझंही संजय दत्त यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. फक्त तीन दिवसांचं शूटींग शिल्लक आहे.
संजय दत्तच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केजीएफ २ मधील त्याच्या लूकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या सिनेमात संजय दत्त अधीराचा रोल साकारत आहे. त्याचा लूक फारच इंटेस होता. या लूकचं सगळीकडून फार कौतुकही झालं होतं.
संजय दत्तने सोशल मीडियावर सिनेमातून छोटा ब्रेक घेत असल्याची माहिती दिली होती. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, 'मित्रांनो, मेडिकल ट्रिटमेंटसाठी मी शॉर्ट ब्रेक घेत आहे. माझे मित्र आणि परिवार माझ्यासोबत आहे. माझ्या फॅन्सनी चिंता करू नये आणि उगाची अंदाजही बांधू नका. तुमच्या प्रेमासोबत आणि आशीर्वादासोबत मी लवकरच परत येईन'.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्त हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे त्याचा कोरोना टेस्टही केली गेली. जी निगेटिव्ह आली. ्त्यानंतर इतर काही टेस्ट केल्यावर निदान झाले की, संजय दत्तला फुप्फुसाचा कॅन्सर आहे. आता उपचारासाठी तो परदेशात जाणार अशी चर्चा आहे. याआधी कॅन्सरने संजय दत्तची आई अभिनेत्री नर्गीस दत्त यांचा जीव घेतला होता तसेच त्याची पत्नी रिया सुद्धा कॅन्सरने मरण पावली होती.
हे पण वाचा :
‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका
टेस्टसोबतच वाढत गेले होते संजय दत्तचे प्रश्न, वाचा हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं...