साऊथ सुपरस्टार यशचा आगामी सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF: Chapter 2) घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. साहजिकच चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. होय, ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये यश (Yash)आहेच. पण त्याच्याशिवाय बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon)यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रकाश राज, अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी,अनंत नाग हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
रिपोर्टनुसार, ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये रॉकी भाईची भूमिका साकारणारा साऊथ सुपरस्टार यशने 25 ते 27 कोटी फी घेतली आहे. संजय दत्तने या सिनेमात अधीराची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 9 ते 10 कोटी रूपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.
रवीना टंडन या चित्रपटात रमिका सेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने 1- 2 कोटी रूपये फी घेतल्याचं कळतंय.
श्रीनिधी ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये रीना देसाईची भूमिका साकारतेय. यासाठी तिने 3 ते 4 कोटी रूपये फी वसूल केली आहे.
‘केजीएफ चॅप्टर 2’ हा सिनेमा प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी मानधन घेतल्याचं कळतंय.
साऊथ व हिंदी सिनेमात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये विजयेंद्र इंगलागीची भूमिका साकारत आहेत. त्यांनी यासाठी 80-82 लाख रूपये मानधन घेतल्याचे कळतंय.
‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये मालविका अविनाश या अभिनेत्रीने एका न्यूज चॅनलच्या चीफ एडिटरची भूमिका जिवंत केली आहे. या रोलसाठी तिने 60 ते 62 लाख रूपये घेतल्याची माहिती आहे. अभिनेते अनंत नाग यांनीही त्यांच्या भूमिकेसाठी 50 ते 52 लाख रूपये वसूल केल्याची चर्चा आहे. हा चित्रपट 16 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट एप्रिल 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.