Join us

'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 09:08 IST

'केजीएफ ३' बद्दलही दिलं अपडेट

केजीएफ स्टार यश (Yash) आगामी 'रामायण' (Ramayan) सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरु होत्या. मात्र याची कोणीच अधिकृत घोषणा केली नव्हती. आता खुद्द यशनेच तो नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रावणाची भूमिका साकारणार असल्याचं कन्फर्म केलं आहे. एका मुलाखतीत त्याने 'केजीएफ ३' बनत असल्याचाही खुलासा केला.

'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत यश म्हणाला, "मी चाहत्यांना वचन देतो की केजीएफ ३ नक्कीच बनणार आहे. पण सध्या दोन प्रोजेक्ट्सवर (रामायण आणि टॉक्सिक) काम सुरु आहे. केजीएफ चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबतही चर्चा सुरु आहे मात्र वेळ योग्य असली पाहिजे. आम्ही याबद्दल सतत बोलत असतो. आमच्याकडे एक चांगली आणि तगडी कल्पना आहे. त्यामुळे यावर पूर्ण लक्ष देणंच योग्य असेल म्हणून आम्ही वेळ मिळेल तेव्हा हे काम हाती घेणार आहोत. यात मला कसलीच घाई करायची नाही. चाहत्यांसाठी केजीएफ ३ आणखी स्पेशल बनेल असा माझा प्रयत्न आहे. चाहत्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं त्यामुळे आता त्यांना गर्व वाटेल असा सिनेमा बनवायचा आहे."

'रामायण'विषयी बोलताना यश म्हणाला, "मी खूप उत्साहित आहे. जर भूमिकेकडे भूमिका म्हणूनच पाहावं...जर असं नाही झालं तर सिनेमा बनणारच नाही. तसंच इतक्या बजेटसोबत सिनेमा बनवायचा त्यासाठी तसे कलाकारही एकत्र आणणं गरजेचं आहे. रावणाची भूमिका अतिशय खोल आणि गुंतागुंतीची आहे. म्हणूनच मी याकडे प्रभावित झालो आणि भूमिका स्वीकारली. ही माझ्या करिअरमधील सर्वात बेस्ट भूमिका असेल."

टॅग्स :यशबॉलिवूडरामायणसिनेमा