१९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारे केजीएफ: चॅप्टर वन हा पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम कथा, नेत्रसुखद दृश्ये आणि कलावंतांच्या अभिनयामुळे यापूर्वीच देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर या कन्नड भाषेतील चित्रपटाने राज्य केले आहे. आता सोनी मॅक्स या सोनी पिक्चर्स नेटवर्कमधील वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. ९ मार्च, २०१९ रोजी रात्री ८ वाजता हा चित्रपट सोनी मॅक्सवर दाखवला जाणार आहे.
प्रशांत नील यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटातील स्टारकास्ट सर्वोत्तम आहे. सुपरस्टार यश यात प्रमुख भूमिकेमध्ये आहे. श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटातून उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. यश अर्थात तो जगातील सर्वांत श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती व्हावा हे आईचे स्वप्न साकार करण्यासाठी या नायकाने कंबर कसली आहे. केजीएफ: चॅप्टर वनची कथा कोलर गोल्ड फील्ड्समधील अत्याचारी प्रशासकांविरुद्ध दिलेल्या लढ्याभोवती फिरते. या लढ्याचे नेतृत्व करणारा माणूस त्याच्या आईने मृत्यूसमयी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक धोकादायक मार्ग स्वीकारतो. ही इच्छा असते त्याला श्रीमंत, शक्तिशाली आणि समृद्ध झालेले बघण्याची. त्याच्या आईने मृत्यूपूर्वी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला त्याची नैतिकता आणि महानता कायम राखण्यात मदत होते.
हा नायक रॉकी कोलर गोल्ड फिल्ड्मधील अत्याचाऱ्यांशी दोन हात करत असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना कर्नाटक, मुंबई आणि कोलर गोल्ड फिल्ड्सची सैर घडवतो.
या चित्रपटाविषयी या चित्रपटाचा नायक यश ऊर्फ नवीन कुमार गौडा सांगतो, ''केजीएफ चॅप्टर वन एक्सेल एन्टरटेन्मेंट अॅण्ड एए फिल्म्सचा चित्रपट 'होम्बल'शी संलग्न असलेल्या प्रत्येकासाठी एक स्वप्नवत प्रकल्प म्हणून सुरू झाला. आम्ही असे काहीतरी करू पाहत होतो, जे विश्वातील सर्वांना आकर्षून घेईल, त्याचबरोबर मोठ्या संख्येने प्रेक्षकांशी जुडले जाईल. आम्ही चित्रपटाचे काम करत असताना आम्हाला खात्री होती की, चित्रपटाच्या प्रबळ पटकथेमुळे चित्रपटाला भव्य यश मिळेल. मला आनंद होत आहे की, प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि भरपूर प्रेम देत आमच्या कामाचे कौतुक देखील केले. मी आता सोनी मॅक्सवर चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरची उत्सुकतेने वाट पाहत आहे.''