Join us

आई तुझी खूप आठवण येते...! आईच्या आठवणीत भावूक झाला शिव ठाकरे, पत्र लिहून व्यक्त केलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 18:58 IST

शिव ठाकरे आपल्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्र लिहत त्याने आईवरील प्रेमही व्यक्त केलं.  

 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो.  नुकतेच तो आपल्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाला. पत्र लिहत त्याने आईवरील प्रेमही व्यक्त केलं.  

शिव ठाकरे सध्या 'खतरों के खिलाडी'च्या १३व्या पर्वातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. शिव 'खतरों के खिलाडी'च्या यंदाच्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. शिवने 'खतरों के खिलाडी'च्या ट्रॉफीवर नाव कोरावं, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. 

'खतरों के खिलाडी' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे.  या कार्यक्रमाच्या १३व्या सीझनलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता 'खतरों के खिलाडी 13' अंतिम फेरीत पोहोचला आहे. शिव ठाकरे, अर्चना गौतम, दिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी, अरिजित तनेजा आणि रश्मीत कौर यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमचा ग्रँड फिनाले 14 ऑक्टोबरला दाखवण्यात येणार आहे. 

टॅग्स :शीव ठाकरेबॉलिवूडखतरों के खिलाडी