२००९ मध्ये स्थापित झालेले अक्षय कुमार (Akshay Kumar)चे केप ऑफ गुड फिल्म्स हे भारतातील सर्वोच्च प्रॉडक्शन हाऊसपैकी एक म्हणून उदयास आले आहे. यांचे चित्रपट हे हृदय आणि मनाला स्पर्श करणारे असून अर्थपूर्ण, तरीही व्यावसायिक असतात. कंपनीचे भागीदार राणा राकेश बाली म्हणतात की, “प्रत्येक कथा सिनेमाच्या माध्यमातून सांगता येते, जर तुम्ही जेंव्हा एखादा चित्रपट बनवता तेंव्हा जो विषय असेल तो प्रेक्षकांना लक्षात घेऊन संवेदनशीलपणे हाताळले गेले पाहिजे. थिएटरमध्ये आपले कष्टाचे पैसे खर्चून कोणीही धडा शिकुन घ्यायला येत नाही. जर तुम्हाला काही गंभीर विषय मांडायचा असेल, तर ते त्यांना हसतखेळत , सकारात्मक समजेल अशा पद्धतीने दाखवावा लागेल. आणि हाच मंत्र केप ऑफ गुड फिल्म्स जोपासतो.”
केप ऑफ गुड फिल्म्स ने गेल्या सहा वर्षांत प्रचंड हिट चित्रपटांचा भाग होता. जसे एअरलिफ्ट (२०१६), टॉयलेट: एक प्रेम कथा (२०१७), मिशन मंगल (२०१९) पासून ते रुस्तम (२०१६), पॅडमॅन (२०१८), चुंबक (२०१७), आणि व्यावसायिक कमाई करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि समीक्षकांकडून प्रशंसित चित्रपट केसरी, गुड न्यूज (दोन्ही २०१९), आणि २०२१ चा सर्वात मोठा हिट सूर्यवंशी यांचा समावेश आहे.मग महिला नायकांनी नेतृत्व केलेले चित्रपट नाम शबाना आणि दुर्गामती: द मिथ (२०२०) असो किंवा लक्ष्मी (२०२०) आणि अतरंगी रे (२०२१) सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होवून, सर्वाधिक बघितले जाणारेआणि नवीन विक्रम रचणारे चित्रपट असो, केप बॅनरने आपल्या वैविध्यपूर्ण आणि पथदर्शक सामग्रीच्या सौजन्याने भारतीय चित्रपट सामग्रीमध्ये नवीन स्थान निर्माण केले आहे. म्युझिक व्हिडीओ मध्ये ही फिलहाल आणि फिलहाल २ गाण्यांनी ही विक्रमी रेकॉर्डस बनवले आहेत.बाली पुढे सांगतात की, "केपचे वेगळेपण म्हणजे ह्यात कोणाचा चेहरा नाही. एक टीम आहे जे वेगवेगळे सिनेमे बनवतात आणि त्यांचा त्यावर विश्वास आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे. आपण जे चित्रपट बनवतो ते व्यक्ती आणि अस्तित्वेपेक्षा मोठे आहेत आणि त्याप्रमाणे जतन केले पाहिजे, हीच आमची भावना आहे ”. हा कंटेंट हाऊस नवीन वर्षात रक्षाबंधन, राम सेतू, आणि OMG 2 सारख्या चित्रपटांसह २०२२ मध्ये प्रवेश करत आहे.