Join us

...म्हणून मी सोशल मीडियापासून दूर राहते, अनन्या पांडेचं वक्तव्य, म्हणाली, "मी ठरवले आहे की.."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 2:58 PM

अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आपल्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट ती शेअर करायची, पण.

एकवेळ अशी होती की अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आपल्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट ती शेअर करायची. काहींना तिची बोल्ड स्टाइल आवडायची, तर काही लोक तिला यावरुन ट्रोल करायचे. कधी अनन्याला तिच्या लूकसाठी तर कधी तिच्या चित्रपटांसाठी ट्रोल करण्यात आले. पण, सध्या अनन्या सोशल मीडियाला टाळते आहे. यामागचे कारण तिनं स्वतः सांगितलं आहे.

अनन्याने सुरुवातीला सोशल मीडियावर मिळणाऱ्या नकारात्मक कमेंट्स आणि ट्रोलकडे दुर्लक्ष केले. नंतर, जेव्हा ट्रोलिंग वाढलं तेव्हा तिने ठरवले की ती सोशल मीडियापासून दूर राहिल. एकदा मीडियाशी संवाद साधताना ती म्हणाली होती, 'फीडबॅक आणि निगेटिव्ह ट्रोलिंगमध्ये एक सीमारेषा असते.अनावश्यक ट्रोलिंग योग्य नाही. कलाकारही माणसेच असतात हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.

अलीकडेच, 'खो गये हम कहाँ'च्या प्रमोशनदरम्यान अनन्या पांडेला सोशल मीडियापासून लांब राहण्यामागचं कारण विचारलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना अनन्या म्हणाली, 'सोशल मीडिया माझ्यासाठी खूप विषारी झालं होतं. एका कोपऱ्यात बसून किती वेळा रडले, म्हणून मी ठरवले आहे की मी यापुढे सोशल मीडियावर सक्रिय राहणार नाही.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती  'ड्रिम गर्ल २' चित्रपटात झळकली होती.  या चित्रपटात अनन्या आयुष्मान खुरानासोबत झळकली. शिवाय, अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. 

 

टॅग्स :अनन्या पांडे