Join us

खुशी-इब्राहिमने रिक्रिएट केला 'कुछ कुछ होता है'चा गाजलेला सीन, 'नादानिया' सिनेमाच्या व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:45 IST

'नादानिया' सिनेमातील एक व्हिडीओ रिलीज झालाय. या व्हिडीओत खुशी-इब्राहिमने गाजलेल्या कुछ कुछ होता हैचा सीन रिक्रिएट केला आहे (naadaniya)

खुशी कपूर-इब्राहिम खानच्या (khushi kapoor) 'नादानिया' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी 'नादानिया' (naadaniyan) सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. खुशी कपूर - इब्राहिम खानच्या (ibrahim khan) भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलं. अशातच 'नादानिया' सिनेमाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओची खासियत अशी की, खुशी कपूर आणि इब्राहिम खानच्या 'नादानिया'च्या व्हिडीओत या दोघांनी 'नादानिया'च्या निमित्ताने 'कुछ कुछ होता है' (kuch kuch hota hai) मधील खास सीन रिक्रिएट केला आहे.

 'नादानिया' निमित्ताने खुशी-इब्राहिमचा व्हिडीओ व्हायरल

नेटफ्लिक्सवर खुशी कपूर-इब्राहिम खानची भूमिका असलेल्या  'नादानिया' सिनेमाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मिस ब्रिगेन्झा वर्गात येतात. वर्गात विद्यार्थी बसलेले असतात. प्रेम म्हणजे काय? असं मिसेस ब्रिगेन्झा सर्वांना विचारतात. खुशीला उत्तर देता येत नाही. पण इब्राहिम त्याच्या मनातील प्रेमाची व्याख्या सर्वांना समजावून सांगतो. सर्वजण त्याच्यावर खूश होतात. पुढे खुशी इब्राहिमला २५ हजार रुपये ट्रान्सफर करते. शेवटी 'नादानिया'ची रिलीज डेट समोर येते. ७ मार्च २०२५ ला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

कुछ कुछ होता हैचा सीन केला रिक्रिएट

शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी सिनेमातील 'कुछ कुछ होता है' सिनेमातील गाजलेला सीन इब्राहिम-खुशीने रिक्रिएट केला आहे. हा सीन बघून सर्वांनाच आनंद आणि नॉस्टॅलजियाचा अनुभव मिळाला. अर्चना पूरण सिंग यांना मिस ब्रिगेन्झाच्या रुपात बघून सर्व खुश झाले. याशिवाय इब्राहिम-खुशीची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांचं मन जिंकतेय. सैफ अली खानचा लेक इब्राहिम यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. तर खुशीचा हा तिसरा सिनेमा आहे. 

टॅग्स :इब्राहिम अली खानखुशी कपूरनेटफ्लिक्स