बॉलिवूडची दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी (Sridevi) यांची धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) हिने देखील आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण केले आहे. खुशीने 'द आर्चीज' (The Archies Movie) सिनेमातून ओटीटीवर पदार्पण केले. आता ती जुनैद खान(Junaid Khan)सोबत 'लव्हयापा'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या सगळ्यामध्ये खुशी कपूरही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. ती 'जिगरा' अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आता खुशीने तिच्या लव्ह लाईफबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
एकीकडे खुशी कपूर आणि वेदांग रैनाच्या डेटिंगच्या चर्चा असताना दुसरीकडे अभिनेत्रीने आता कबूल केले आहे की तिला कधीच कोणी प्रपोझ केले नाहीये. खरेतर, कनेक्ट सिनेसोबतच्या रॅपिड-फायर राउंड दरम्यान, खुशीला विचारले गेले की तिला तिच्या फोनवर कोणता रोमँटिक क्षण कॅप्चर करायचा आहे. तिने उत्तर दिले, "खरंच नाही, पण मला वाटतं की मी एक प्रस्ताव ठेवेन." जेव्हा तिला विचारले की आधीच्या कोणत्याही प्रस्तावाचा तिच्यावर परिणाम झाला आहे, तेव्हा तिने स्पष्टपणे स्वीकारले, "मला अद्याप कोणी प्रपोझ केले नाही."
खुशी आणि वेदांग अनेकदा दिसलेत एकत्र खरेतर बरेच दिवसांपासून अशी चर्चा होती की, खुशी कपूर 'द आर्चीज'चा सहकलाकार वेदांग रैनाला डेट करते आहे. ते दोघे बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले होते. नुकतेच वेदांगला खुशीच्या पायजमा बर्थडे पार्टीत पाहिले होते. ज्यात तिचे चांगले मित्रमंडळी सहभागी झाले होते. त्याला बोनी कपूर, खुशी आणि तिच्या स्क्वॉड गर्लसोबत पोझ देताना दिसला होता. खुशी आणि वेदांग नेहमीच रुमर्ड रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. मात्र अद्याप त्या दोघांनी यावर मौन बाळगले आहे.
कधी रिलीज होतोय खुशी-जुनैदचा 'लवयापा'?खुशी कपूर लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत लवयापामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जेन-झी रिलेशनशिपवर आधारित आहे, या चित्रपटात जुनैद खान आणि खुशी कपूर व्यतिरिक्त ग्रुषा कपूर, आशुतोष राणा, किकू शारदा आणि कुंज आनंद सारखे कलाकार आहेत. अद्वैत चंदन दिग्दर्शित आणि फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट निर्मित, लावयापा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.