Join us

सिडच्या दुल्हनियाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमानच्या सल्ल्यावरुन बदलले होते तिचं नाव, जाणून घ्या तिचं खरं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:08 IST

आज सिद्धार्थ व कियारा लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कियाराचं खरं नाव काय आहे ते..

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अथिया शेट्टीनंतर आता अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी या वर्हाडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, जुही चावला आणि इशा अंबानी आदींचा समावेश आहे. 

सिद्धार्थ व कियारा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. या रिलेशनशिपमध्ये अनेक चढऊतार आलेत. पण सरतेशेवटी प्रेमाचाच विजय झाला आणि आज दोघंही लग्न करणार आहेत.  बॉलिवूड ब्युटी कियारा अडवाणीने इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आज तिचा स्वत: एका मोठा चाहतवर्ग आहे. भलेही तिने साऊथ सिनेमातून सुरूवात केली असेल, पण तिला बॉलिडूनेच जास्त ओळख दिली. 'कबीर सिंह' सारखा सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर आहे.

कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. सलमान खानने तिला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.  सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.   ​

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी