Join us

'कबीर सिंग'मधील कियाराच्या डी-ग्लॅम लूकची सगळीकडे होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:28 IST

अभिनेत्री कियारा आडवाणी आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे खुप चर्चेत आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणी आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे खुप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. या चित्रपटातील गाण्यांना देखील रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विशेष करून कियाराने आतापर्यंत न दिसलेल्या अशा एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटातील लूकची सध्या सगळीकडे चर्चा होते आहे. कियारा आडवाणी स्वतः कबीर सिंगमधील भूमिका साकारून खूप खूश आहे. तिच्या मते प्रितीची भूमिका तिच्या करियरला कलाटणी देणारी ठरेल.

कियाराने सांगितले की, ती दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. दिग्दर्शक सांगतील त्याप्रमाणे ती काम करते.  मला वाटते की दिग्दर्शकाचा एक दृष्टीकोन असतो. तो त्या अंदाजातून पात्रांना पाहत असतो. त्यानुसार मी त्याला फॉलो करते. कबीर सिंगमधील प्रीती निरागस व साधी आहे. ती कबीरला तिच्यावर प्रेम करण्यासाठी प्रेरीत करते. ती पुढे म्हणते की, दिग्दर्शक संदीप सरांना या चित्रपटात १९ वर्षीय मुलीच्या रुपात दिसली पाहिजे. ती मेडिकलच्या पाचव्या वर्षातील विद्यार्थीनी वाटली पाहिजे. 

कियाराने सांगितले की, या भूमिकेसाठी दिग्दर्शक संदीप यांना जास्त मेकअप नको होता. कारण प्रीतीचा निरागसपणा दिसला पाहिजे. विनामेकअप करण्यात कियाराला काहीच अडचण नाही. ती म्हणते की दिग्दर्शकाची डिमांड आहे. दिग्दर्शकाला कियाराचा नॅचरल लूक प्रेक्षकांसमोर यावा असे वाटत होते.

मेकअप न करण्याचा फायदा झाल्याचे कियारा सांगते. ती म्हणाली की, दररोज मला मेकअपसाठी चित्रीकरणाच्या आधी तीन-चार तास आधी जावे लागत नव्हते आणि सकाळी खूप लवकरही पोहचावे लागत नव्हते. कारण अभिनेत्रींना मेकअपसाठी सेटवर तीन ते चार तास आधी सेटवर पोहचावे लागते.

कियारा कबीर सिंग चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त ती गुड न्यूज, लक्ष्मी बाँब, शेरशाह व इंदु की जवानीमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीकबीर सिंगशाहिद कपूर