Join us

Kiara Advani : कियारा अडवाणी प्रेग्नंट? तिचं हे वागणं बघून सोशल मीडियावर सुरू झाली भलतीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:40 IST

Sidharth Malhotra and Kiara Advani: होय, आता काय तर कियारा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ व कियाराचा एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हा अंदाज बांधला आहे...

कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) चार दिवसांआधीच लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कियारा व सिडने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाबद्दलची प्रत्येक गोष्ट कपलने अतिशय सीक्रेट ठेवली. पण लग्नानंतर या कपलने मीडियाला अगदी मनमोकळेपणानं पोझ दिल्यात. सोशल मीडियावर लग्नाचे फोटोही शेअर केलेत. आता काय तर कियारा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. होय, सोशल मीडियावर सिद्धार्थ व कियाराचा एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हा अंदाज बांधला आहे. आता ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

तर लग्नानंतर कियारा व सिद्धार्थ दोघंही जैसलमेरवरून दिल्लीला रवाना झाले. यादरम्यान जैसलमेर एअरपोर्टवरचा दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत कियारा स्कार्फने पोट लपवताना दिसतेय. याआधी जैसलमेरला लग्नासाठी आली तेव्हाही कियाराने पिंक कलरचा स्कार्फ घेतला होता. 

लग्नासाठी मुंबईतून निघताना असो, जैसलमेरला पोहोचल्यावर किंवा तिथून निघताना असो  कियाराचं हे वागणं अनेकांना खटकलं. हे सगळं अनावधानानं तिच्याकडून घडलं की ती जाणीवपूर्वक करत होती, हे माहित नाही. पण नेटकऱ्यांनी नेमकी हीच बाब हेरली आणि त्यावरून कमेंट करत एका नव्या चर्चेला तोंड फोडलं.

अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. मला खात्री आहे, दोन तीन महिन्यानंतर हीसुद्धा आलियासारखीच गुडन्यूज देणार, असं एका युजरने लिहिलं आहे. जिथे जाईल तिथे पोट लपवतेय, लोकांना मूर्ख समजतेय का, अशी कमेंट एका युजरने केली आहे. आलियासारखीच ही सुद्धा प्रेग्नंट आहे, असा दावा एका युजरने केला आहे. कियारा प्रेग्नंट आहे की नाही, याबद्दल आम्ही ठामपणे कुठलाही दावा करत नाही. पण तूर्तास कियाराच्या प्रेग्नंसीची चर्चा जोरात आहे.  

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्राबॉलिवूडसोशल मीडिया