Join us

Ufff!! कियारा अडवाणीच्या आईला कधी पाहिलंत? दिसते अभिनेत्री इतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 5:21 PM

Kiara Advani : कियारा अडवाणी ही बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री. तूर्तास मात्र चर्चा आहे ती कियाराच्या एका पोस्टची. होय, कियाराने एक फोटो शेअर केलाय आणि या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कियारा अडवाणी (Kiara Advani) ही बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री. 2014 साली फगली  सिनेमातून तिचा डेब्यू झाला. पण ‘एम.एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील तिचा चेहरा एकदम प्रेक्षकांच्या डोळ्यांत भरला. ‘कबीर सिंग’ नंतर तर तिचा चेहरा चाहत्यांच्या जणू काळजावर कोरला गेला. आज कियारा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तूर्तास मात्र चर्चा कियाराच्या एका पोस्टची आहे. होय, कियाराने एक फोटो शेअर केलाय आणि या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो आहे कियाराच्या आई-बाबाच्या लग्नाचा. विशेष म्हणजे या फोटोला कियारानं दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी आहे.

‘माझ्या आईवडिलांचा हा फोटो माझ्या सर्वात आवडत्या फोटोंपैकी एक आहे. परफेक्ट मॅरेज म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी मी नेहमीच या दोघांकडे पाहते. त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. आता मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कृपया मला सल्ला द्या. असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर सगळं काही बदलतं. खरंच सगळं बदलतं का?,’असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.कियारानं शेअर केलेला आईबाबाच्या लग्नाचा फोटो आणि त्याच्या कॅप्शनवरून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. कियारा लग्न वगैरे करतेय का? असा सवाल चाहते विचारत आहेत. काहींना मात्र हा नव्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग वाटतोय.

हा फोटो शेअर करण्यामागचा कियाराचा उद्देश काय, हे ठाऊक नाही. पण एक मात्र खरं की चाहते कियारासारखेच या फोटोच्याही प्रेमात पडले आहेत. कियाराचे आईबाबा किती सुंदर आहेत. लग्नात ते किती सुंदर दिसत होते, अशा आशयाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. कियाराच्या कुटुंबाचा ग्लॅमरच्या दुनियेशी तसा प्रत्यक्ष संबध नाही. पण हो, बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या कलाकारांशी कनेक्शन मात्र नक्कीच आहे. कियाराचे आजोबा हमीद जाफरी हे प्रसिद्ध कलाकार सईद जाफरी यांचे लहान भाऊ होते. त्यांचं पहिलं लग्न कियाराच्या आजीशी झालं होतं.  ज्या ब्रिटीश महिला होत्या. यानंतर हामिद यांनी दुसरं लग्न भारती गांगुलीशी केलं. भारती म्हणजे अशोक कुमार यांची मुलगी. भारती यांनीच कियाराची आई जिनेवीव यांना वाढवलं. 

तुम्हाला माहित नसेल पण कियाराची आई जिनेवीव भाईजान सलमान खान ची बालपणीची मैत्रीण आहे. दोघंही वांद्रे येथे राहत आणि लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतं. जिनेवीवनेच कियाराची मावशी शाहीन आणि सलमानची भेट घालून दिली होती.   फार पूर्वी सलमाननं कियाराची मावशी शाहीनला डेटही केलं होतं.  सलमान आणि शाहीनचं हे पहिलं रिलेशनशिप होतं. खुद्द कियारानं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूड