Join us

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ की दुल्हनियां लग्नासाठी पोहचली जैसलमेरला, चेहऱ्यावर दिसतोय लग्नाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:25 IST

आज संध्याकाळपासून कियारा अडवाणीच्या लग्नाच्या विधींना सुरूवात होणार असून अभिनेत्री जैसलमेरला पोहोचली आहे.

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding: आज संध्याकाळपासून कियारा अडवाणीच्या लग्नाच्या विधींना सुरूवात होणार असून अभिनेत्री जैसलमेरला पोहोचली आहे. कियारा जैसलमेर विमानतळावर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत स्पॉट झाली. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या कुटुंबीयांनी एका खास परफॉर्मन्सची तयारी केली आहे. त्याचबरोबर संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये काला चष्मा ते बिजली, रंगिसारी, डिस्को दिवाने आणि नचदे ने सारे या गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​६ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे. पण लेटेस्ट रिपोर्टनुसार 7 फेब्रुवारीला सिड आणि कियारा राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे कुटुंब जैसलमेरला पोहोचले असून आजपासूनच प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होतील.  

 सिद्धार्थ-कियाराची सुरक्षाही एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आली आहे. वृत्तानुसार शाहरुख खानच्या माजी सुरक्षारक्षकाला सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्न सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या भव्य लग्नाला फक्त १००-१२५ पाहुणे येणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी ८४ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्या अत्यंत महागड्या असून या पॅलेसमधील एका खोलीचं भाडं एका दिवसासाठी सुमारे दीड लाख रुपये आहे. त्याचबरोबर पाहुण्यांच्या वाहतुकीचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. लग्नासाठी ७० वाहनं बुक करण्यात आली आहेत. ज्यात लक्झरी कार देखील आहेत.

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा