बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कबीर सिंग चित्रपटानंतर नुकताच तिचा शेरशाह चित्रपट रिलीज झाला. यात तिने डिंपलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. कियारा आडवाणीने २०१४ साली 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी पहिल्या चित्रपटातून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २०१६ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी'ःद अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिने साक्षी रावत ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियापासून ते बॉलिवूडच्या कॉरिडॉरपर्यंत कियाराने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा होती. याबाबत आता तिने मोठा खुलासा केला आहे.
आजही सोशल मीडियावर कियारा अडवाणीने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा होताना दिसते. युजर्स असेही म्हणतात की, ज्याप्रकारे अभिनेत्रीने आपले नाव आलियावरून बदलून कियारा केले आहे. यावरुन तिने सुंदर दिसण्यासाठी सर्जरीदेखील केली असणार आहे. याबद्दल कियारा सांगते की, अनेकदा तिला अशा कमेंट्स वाचायला मिळतात. मात्र ती याकडे कानाडोळा करते.
अरबाज खानच्या 'पिंच' या टॉक शोमध्ये कियाराने ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले आहे. निर्मात्यांनी शोचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यात कियारा म्हणते की, 'एका कार्यक्रमादरम्यान सर्वजण चर्चा करत होते की, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे.' कियारा सांगते की, ही चर्चा इतकी वाढली होती की क्षणभर मलाही खात्री झाली की मी शस्त्रक्रिया केली आहे.
कियारा सांगते, 'मी एका कार्यक्रमासाठी गेले होते, सोशल मीडियावर व्हायरल झालेले यावेळचे फोटोमध्ये लोक तिच्या कमेंटमध्ये लिहित होते की, अरे, हिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. परिस्थिती अशी होती की मी स्वतः विश्वास करू लागले की मी स्वतःसाठी काहीतरी केले आहे. त्यामुळे कियाराच्या या वक्तव्यावरुन तिने कोणतीही सर्जरी केलेली नाही हे खरे.
कियारा आडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिचा नुकताच शेरशाह चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर आता ती राज मेहता यांच्या जुग जुग जिओ सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात वरूण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ती अनीस बझ्मीच्या 'भूल भुलैया २' देखील झळकणार आहे.या चित्रपटात ती कार्तिक आर्यन आणि तब्बूसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती रणवीर सिंगसोबत 'अन्नीयन'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.