Join us

OMG - 300 कोटी कमावणाऱ्या सिनेमाची अभिनेत्री कपड्यांवर केवळ करते इतकाच खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:26 IST

लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. खरे तर ‘फग्ली’ या पहिल्याच चित्रपटाने करिअरच्या सुरुवातीला कियाराला मोठा धक्का दिला. पहिलाच डेब्यू सिनेमा फ्लॉप झाला. पण कियाराने हार मानली नाही. पुढे ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी ’ हा सिनेमा मिळाला आणि कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली. तिचा गोड चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले. यानंतर ‘लस्ट स्टोरीज्’ही वेबसीरिज आली आणि कियारा ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'गुडन्युजच्या प्रमोशन दरम्यान कियाराने एका ग्रीन रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला डीप गळा आणि त्यावर चमचमते जॅकेट घातले होते.

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार कियाराच्या जॅकेटची किंमत 14, 164 आहे तर पँटची किंमत 17,750 इतकी आहे. या ड्रेसवर कियाराने कोणतीच एक्सेसरीज घातली नव्हती. त्यामुळे तुम्हाला जर कियारासारखा लूक हवा असेल तर त्यासाठी जवळपास 31 हजार मोजावे लागतील.   

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, कियारा आडवाणी ‘भूल भुलैया 2’ कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.  10 मार्चलाच सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली होती. 15 एप्रिलपर्यंत शूटिंगचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या भीतीमुळे या सिनेमाचे शूटिंग मध्येच थांबवण्यात आले आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणी