Join us

'किक २' सलमान खानचा डबल रोल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 8:58 AM

सलमान खान सध्या आपल्या नवीन चित्रपट 'रेस३' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी सलमान खानकडे बिग बजेट ...

सलमान खान सध्या आपल्या नवीन चित्रपट 'रेस३' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी सलमान खानकडे बिग बजेट चित्रपट आहेत. रेसनंतर सलमान खान 'दबंग ३ , भारत आणि 'किक २'  च्या चित्रीकरणात व्यस्त होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'किक २' बद्दल अशी माहिती येत होती की सलमान खान ह्या चित्रपटात डबल रोल करणार आहे. पण जर तुम्ही सलमान खानला डबल रोल मध्ये बघण्यात उत्सुक असाल तर तसे करू नका.झाले असे की नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद नाडियाडवलाने डीएनएशी बोलताना सलमान खानच्या 'किक २' मधील डबल रोलची भूमिकेची बातमी खोटी असल्याचे सांगितले. साजिद म्हणाला, "ही बातमी खरी नाही आहे  मी ह्या बद्दल आता जास्त सांगू शकत नाही पण ह्या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळे असेल.'' 'किक २' हा बिग बजेट चित्रपट आहे आणि सलमान खान बरोबर काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीची जवाबदारी वाढलेली असते कारण ते काही केल्या सलमान खानच्या चाहत्यांना निराश न करण्याचा प्रयत्नात असतात.ALSO READ :  ​सलमान खान म्हणतो, आता कधीच करणार नाही ‘ती’ चूक!!२०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'किक'द्वारे साजिदने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता 'किक२' साठी साजिद पुन्हा एकदा भरपूर मेहनत घेत आहे. सध्या साजिद चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहे. जेव्हा साजिदला विचारले, की ह्या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचे ठरल्यावर सलमान खान ची के प्रतिक्रिया होती? तेव्हा साजिद ने सांगितले ' सलमान चे रिअक्शन नेहमी शेवटी येते तो सुरवातीला हो ला हो करतो नंतर एक महिना तो स्क्रिप्ट ऐकतो आणि नंतर दोन महिन्यानंतर तो त्याची प्रतिक्रिया देतो. साजिद पुढे म्हणतो की "सलमान जेव्हा सेट वर असतो तेव्हा तो एक सह-लेखक बनतो. आम्ही नेहमी चांगला चित्रपट बनवण्याचे प्लनिंग करतो ह्या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम चालू आहे, ही स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल.