Join us

काय म्हणता? किकू शारदाच्या जोक्सनी आलिया भट झाली नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 13:34 IST

आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा अशी सगळी ‘कलंक’ची स्टारकास्ट नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचली. साहजिकच ‘द कपिल शर्मा शो’च्या शोवर नेहमीप्रमाणे धम्माल मस्ती झाली. पण या सगळ्या धम्माल मस्तीत किकू शारदाच्या जोक्सनी आलिया मात्र नाराज झाली

ठळक मुद्देआलिया व वरूणचा ‘कलंक’ हा सिनेमा याच महिन्यात १७ एप्रिलला प्रदर्शित होतोय.

आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा अशी सगळी ‘कलंक’ची स्टारकास्ट नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचली. साहजिकच ‘द कपिल शर्मा शो’च्या शोवर नेहमीप्रमाणे धम्माल मस्ती झाली. पण या सगळ्या धम्माल मस्तीत किकू शारदाच्या जोक्सनी आलिया मात्र नाराज झाली.होय, ताजी बातमी खरी मानाल तर किकू शारदाच्या जोक्समुळे आलिया बरीच अपसेट झालेली दिसली. किकूचे सगळे जोक्स आलियाच्या अवती-भवती फिरणारे होते. स्कूटर कसा आवाज करते? असा प्रश्न किकूने विचारला आणि मग ‘भट्ट, भट्ट, भट्ट’ असे स्वत:च उत्तर दिले. यानंतर महेश भट कंस्ट्रक्शनचा बिझनेस करतात का? असा प्रश्न त्याने आलियाला केला. यावर नाही तर,का? असे आलिया म्हणाली. यावर कारण सडक व फुटपाथ सगळे महेश भट बनवतात, म्हणून, असे किकू शारदा म्हणाला. आलियाला किकूचे हे जोक्स अजिबात आवडले नाहीत. त्यामुळे कपिल शर्माच्या शोवर आलिया बरीच गप्प-गप्प दिसली. त्यातच, वरूणनेही आलियाची टर उडवायला सुरुवात केल्यावर ती अधिकच गप्प झाली.

आलिया व वरूणचा ‘कलंक’ हा सिनेमा याच महिन्यात १७ एप्रिलला प्रदर्शित होतोय. अभिषेक वर्मन दिग्दशर्र््िात या चित्रपटात संजय दत्त व माधुरी दीक्षितही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘कलंक’ हा करण जोहरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा करणच्या वडिलांचे स्वप्न होते. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करणने कुठलीही कसर सोडलेली नाही.

 

टॅग्स :आलिया भटकलंककपिल शर्मा किकू शारदा