Join us

किम शर्मानं कन्फर्म केलं लिएंडर पेससोबतचं नातं! शेअर केला रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 10:20 IST

अभिनेत्री किम शर्मा गेल्यावर्षी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत फिरताना दिसत होती. आता ती माजी टेनिसपटू लिएंडर पेससोबत फिरताना दिसतेय...

ठळक मुद्देकिम शर्मा याआधी हर्षवर्धन राणेच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या.

अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma ) गेल्यावर्षी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत फिरताना दिसत होती. आता ती माजी टेनिसपटू लिएंडर पेससोबत ( Leander Paes) फिरताना दिसतेय. गेल्या अनेक दिवसांपासून किम व लिएंडर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र आता किमने तिच्या इन्स्टा हँडलवर लिएंडरसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर फार काही सांगायची गरज नाही. दोघांनीही आपलं रिलेशनशिप कन्फर्म केल्याचं यानंतर मानलं जातंय. या फोटोमध्ये किम शर्मा पांढ-या रंगाच्या गाऊनमध्ये  आहे. तर लिएंडर पेस निळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये दिसतोय. किम कॅमेºयाकडे पाहून पोज देतेय तर लिएंडरच्या नजरा तिच्या चेह-यावर खिळल्या आहेत.  

किम व लिएंडरच्या अफेअरच्या चर्चा कधी सुरू झाल्यात तर गोवा व्हॅकेशननंतर. गोवा व्हॅकेशनचे दोघांचे काही फोटो व्हायरल झाले होते.   यानंतर त्यांच्यामध्ये अफेअरची चर्चा सुरू झाली.

किम शर्मा याआधी हर्षवर्धन राणेच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होते.  ब्रेकअपनंतर किम भारत सोडून विदेशात गेली आणि  अचानक तिच्या लग्नाचीच बातमी आली. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी तिनं संसार थाटला. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांच्या आतच ते वेगळे झाले. त्यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना आला होता.लिएंडरचं म्हणाल तर तो संजय दत्तची एक्स-वाईफ व मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह-इनमध्ये होता. दोघांना एक मुलगीही आहे.

टॅग्स :किम शर्मालिएंडर पेस