Join us

Lockdownमध्ये असा वेळ घालवतेय क्रिती सनॉन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:33 IST

तिचे फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

लॉकडाऊनमुळे सध्या सगळीकडेच शूटिंग थांबले आहे. परिणामी सर्व कलाकार आपल्या घरी कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

इन्स्टाग्रामवर क्रितीने तिचे दोन विचित्र विचित्र रिअॅक्शन देणाार व्हिडीओ शेअर केले आहे. एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती काचेच्या खिडकीतून नॉक करते आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत ती बोटांची बंदूक करुन स्वत:च्या डोक्यावर शूट करताना दिसतेय. या व्हिडीओ सोबत क्रितीने कॅप्शन दिले आहे की, 'या लॉकडाऊनने मला काही असे केले आहे.' 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच मिमी सिनेमात दिसणार आहे. यात ती  एका सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. महिलाप्रधान हा सिनेमा असून त्याची कथा महिलाच पुढे नेते. मराठीत आलेल्या 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारित हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत. 

टॅग्स :क्रिती सनॉन